Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेश'त्या' वक्तव्यामुळे बाबा रामदेव अडचणीत; IMA ची गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘त्या’ वक्तव्यामुळे बाबा रामदेव अडचणीत; IMA ची गुन्हा दाखल करण्याची मागणी

दिल्ली | Delhi

योगगुरू बाबा रामदेव एका वक्तव्यामुळे अडचणीत आले आहे. योगगुरु रामदेव यांच्या वक्तव्याविरोधात IMA नं आक्रमक पवित्रा कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बाबा रामदेव अ‍ॅलोपॅथी सायन्स विषयी अवमानजनक भाषा वापरताना दिसत आहेत. अ‍ॅलोपॅथी हा प्रकार म्हणजे मुर्खपणा आहे आणि तो दिवाळे काढणारा आहे, असं बाबा रामदेव बोलताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव अ‍ॅलोपॅथी च्या अपयशाबद्दल भरभरून बोलताना दिसत आहेत.

IMA नं एक पत्रक जारी केलं आहे. ‘एक तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी योगगुरु रामदेव यांनी केलेले आरोप मान्य करावे आणि आधुनिक उपचार पद्धती रद्द करावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याविरोधात साथ नियंत्रक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा’, अशी मागणी त्यांनी पत्रकात केली आहे.

IMA नं म्हंटलं आहे की, ‘भारत सध्या करोना महामारीचा सामना करत आहे. या बिकट काळात अ‍ॅलोपॅथी ही आधुनिक चिकित्सा पद्धती आणि भारत सरकार मिळून लोकांची जीव वाचवण्यात व्यक्त आहेत. या संर्घषात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या १२०० अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी आपलं बलिदान दिलं आहे.’

तसेच, प्रेसनोटमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना उद्देशून IMA नं म्हटलं की, व्हिडिओत बाबा रामदेव म्हणतात, अ‍ॅलोपॅथी एक मूर्ख आणि दिवाळ काढणारं विज्ञान आहे. पण जेव्हा बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण हे आजारी पडतात तेव्हा ते देखील अ‍ॅलोपॅथीचीच औषधं घेतात. त्यामुळे बाबा रामदेव अ‍ॅलोपॅथीवर बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. कारण आपल्या बेकायदा आणि मंजुरी नसलेली औषध विकायची आहेत.’

‘देशातील डॉक्टर आपल्या जीवाचा विचार न करता कोरोनाच्या या काळात झोकून देऊन रुग्णांची सेवा करत आहेत आणि हे स्वयंघोषित व्यापारी बाबा त्यांच्याबद्दल चुकीची माहिती आणि तिरस्कार समाजात पसरवत आहे. तसेच डॉक्टर आणि रुग्णांच्या संबंधावर रामदेव बाबांच्या वक्तव्यामुळे परिणाम होऊ शकतो,’ असेही या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या