Sunday, March 30, 2025
Homeमहाराष्ट्रMaharashtra Rain Update : IMD कडून राज्यातील 'या' चार जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' जारी...

Maharashtra Rain Update : IMD कडून राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी  

मुंबई | Mumbai

दोन दिवसांपासून पावसाने (Rain) मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांना चांगलेच झोडपून काढले असून राज्यातील इतर जिल्ह्यांतही पावसाचे घमासान सुरूच आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात अतिवृष्टी झाली असून शेतीच्या पिकांचे (Crops) मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मंगळवार (दि.९ जुलै) रोजी राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज वर्तवविला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मुंबईसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार; IMD कडून हायअलर्ट

हवामान विभागाने (IMD) पश्चिम घाट क्षेत्रात असलेल्या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पुढील २४ तासांत राज्यातील चार जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच आज मुंबई, ठाणे भागासह मुंबई उपनगर, पालघर, रायगड या जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हे देखील वाचा : अजित पवार आमदारांसह सिद्धिविनायकाच्या चरणी; फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ

त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र (Uttar Maharashtra) मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमी असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. तर पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...