Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसह राज्यातील 'या' जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार; IMD कडून हायअलर्ट

मुंबईसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार; IMD कडून हायअलर्ट

राज्यातील पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काल रात्रीपासून मुंबईत (Mumbai) पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे घरांत पाणी साचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तसेच जागोजागी पाणी साचल्याने पहिल्याच पावसात मुंबईची ‘तुंबई’ झाली आहे. त्यातच आता मुंबईसह राज्यात पुढील ३ ते ४ तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असून काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Heavy Rain In Mumbai : मुसळधार पावसाचा फटका आमदार आणि मंत्र्यांनाही; मंत्री अनिल पाटील, मिटकरी ट्रॅकवर

हवामान विभागाने (IMD) कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यातील कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड अलर्ट तर रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी अरण्यात आला आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी (Maharashtra) यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हे देखील वाचा : नाशिकमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हिट अ‍ॅण्ड रन

याशिवाय मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.आज दुपारच्या सुमारास समुद्रात (Sea) ४.४० मीटर उंच भरती आहे.या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून, तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना (Collage) दुसऱ्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली तेथील नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बचाव पथकांच्या काही तुकडांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्याबरोबरच समुद्र किनारपट्टीवर नागरिकांनी फिरण्यासाठी जाऊ नये,असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान या आढावा बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ‌ आय.एस.चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या