Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याअक्षय्य तृतीयेचे महत्व काय? जाणून घ्या सविस्तर

अक्षय्य तृतीयेचे महत्व काय? जाणून घ्या सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

साडे तीन मुहुर्तापैकी एक असेलेली अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) आज साजरी होत आहे. जे क्षय पावत नाही ते अक्षय. वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीयेला येते म्हणून तिला नाशिकला अक्षय्य तृतीया तर खान्देशात ‘आखाजी’ म्हणतात….

- Advertisement -

खान्देशात (Khandesh) तर ही एक प्रकारे दिवाळीच असते. पितरांची आठवण करून त्यांची पूजा करणारा हा दिवस. घागर, आंबे, खरबूज यादिवशी दान केले जाते. घरोघरी कैरीचे पन्हे, आंब्याचा रस, कुरड्या, सांडग्या, मैद्यापासून बनविण्यात येणारी गोड पापडी आणि शेवयांचा अक्षय्य तृतीयेच्या जेवणात हमखास समावेश असतो.

या दिवशी आपले पूर्वज पाणी (Water) पिण्यासाठी येतात, अशी श्रद्धा आहे. आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नवीन माठ वापरण्यात आजपासून सुरुवात होते. आखाजी हा सण पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी घरोघरी त्यांचे स्मरण करुन प्रतिमेचे पूजन केले जाईल.

देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य होते. अक्षय्यतृतीयेला तीलतर्पण करणे, मृतिकापूजन करणे अशा प्रथा आहेत. या तिथीला विशेष महत्त्व आहे. स्नान, श्री विष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण करण्याची पद्धत आहे. अक्षयतृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही, अशी आख्यायिका आहे.

जैन धर्मात विशेष महत्त्व

जैन Jain() धर्मीयांमधेही अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya) विशेष महत्त्व आहे. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांनी एका वर्षाची तपस्या पूर्ण झाल्यानंतर प्रथम आहार घेतला होता. याचदिवशी राजा श्रेयांसने मुनिराज वृषभदेवांना भक्तिपूर्वक उसाच्या रूपात आहार दान देऊन अक्षय पुण्य प्राप्त केले होते. पुण्याईचा साठा वाढण्यासाठी अक्षय्य तृतीयेचे पूजन सांगितले आहे.

आज दानाला व सोने खेरदीला विशेष महत्व असल्याने सराफा दालनेही सजली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सराफांनी योजना जाहीर केल्या आहे. गेल्या दोन वर्षांच्या निरुत्साहानंतरही यंदा प्रथम खुल्या वातावरणात आखाजी साजरी होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

घरोघर खरबूज (Muskmelon) व आंबे (Mango) आणले जाणार असल्याने शहरात मोठ्या प्रमाणाावर आंबे विक्रीस आले आहेत. यंदा अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) आणि रमजान ईद (ramazan eid) एकाच दिवशी असल्याने सामाजिक आणि धार्मिक सलोख्याचे दर्शनही घडत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या