Wednesday, December 4, 2024
Homeजळगावराज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतीम फेरीत रत्नागिरीचे 'राखेतून उडाला मोर' प्रथम क्रमांकाचे मानकरी

राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतीम फेरीत रत्नागिरीचे ‘राखेतून उडाला मोर’ प्रथम क्रमांकाचे मानकरी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

19 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या (19th Maharashtra State Children’s Theater Competition) अंतिम फेरीत (final round) मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरी (Maratha Temple a. K. Desai High School Ratnagiri) यासंस्थेच्या राखेतून उडाला मोर या नाटकाला प्रथम पारितोषिक (first prize) तर शिवरणभूमी प्रतिष्इान सेवा संस्था ऐरोली, नवी मुंबई यासंस्थेच्या तळमळ एका अडगळीची या नाटकास द्वितीय तर आर्यन्स वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी, कात्रज, पुणे यासंस्थेच्या बळी या नाटकास तृतीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे (Directorate of Cultural Affairs) करण्यात आली आहे.

- Advertisement -

शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात 19 वी महाराष्ट्र बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पडली होती. या नाटयस्पर्धेत एकूण 23 नाट्यप्रयोगांचे सादरीकरण झाले होते. त्या स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे मंगळवार दि. 14 रोजी जाहीर करण्यात आला.

यामध्ये दिग्दर्शन- प्रथम प्रशांत निगडे (नाटक-तळमळ एका अडगळीची), द्वितीय संतोष गाडी(नाटक-राखेतून उडाला मोर), तृतीय मुग्धा वडके (नाटक- बळी), नाटयलेखन प्रथम संध्या कुलकर्णी(नाटक- बळी, द्वितीय – संकेत तांडेल (नाटक- अजब लोठ्यांची महान गोष्ट), प्रकाश योजना प्रथम साईप्रसाद शिर्सेकर (नाटक-राखेतून उडाला मोर), द्वितीय विनोद राठोड (नाटक- ध्येयधुंद), नेपथ्य प्रथममुकुंद लोखंडे (नाटक गोष्टींची स्टोरी), द्वितीय प्रविण धुमक (नाटक- राखेतून उडाला मोर), संगीतदिग्दर्शक प्रथम निखील भुते (नाटक राखेतून उडाला मोर), द्वितीय ओंकार तेली (नाटक-तळमळएका अडगळीची), वेशभूषा प्रथम वर्षा लोखंडे (नाटक गोष्टींची स्टोरी), द्वितीय विरीशा नाईक(नाटक- तळमळ एका अडगळीची), रंगभूषा प्रथम निलम चव्हाण (नाटक- तळमळ एका अडगळीची), द्वितीय वर्षा लोखंडे (नाटक गोष्टींची स्टोरी) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक पुरुष नीरज हुलजुते (नाटक-काश्मिर स्माईल)अर्जुन झेंडे (नाटक- तळमळ एका अडगळीची), आर्यन बोलीज (नाटक-बदला), सोहम पानबंद (नाटक- गुहेतील पाखरं),प्रणीत जाधव (नाटक- हलगी सम्राट), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक स्त्री गायत्री रोहकले (नाटक- अजब लोठ्यांची महानगोष्ट), सायुरी देशपांडे (नाटक- ध्येयधुंद), स्वराली तोडकर (नाटक या चिमण्यांनो परत फिरा रे), अस्मी गोगटे (नाटक-बळी), आर्या रायते (नाटक गोष्टींची स्टोरी) अभिनवासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे आर्या देखणे (नाटक अजब लोठ्यांचीमहान गोष्ट), शर्वरी पवार (नाटक- यम्मी मम्मी, उम्मी), कृपा म्हात्रे (नाटक- रेस 2), तेजस्विनी टक्कर (नाटक-खिडकी),आस्था सोनी (नाटक- काश्मिर स्माईल), मानस तॉडवळकर (नाटक- तळमळ एका अडगळीची), श्लोक नेरकर (नाटक-बदला), राजीव गानू (नाटक-ध्येयधुंद) यांना जाहीर झाले आहे. .

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संजय पेंडसे, रमाकांत मुळे, रमेश भिसीकर, चेतना वैद्य आणि केशव भागवत यांनी तर समन्वयक म्हणून भूषण वले, होणाजी चव्हाण यांच्यासह सभासदांनी काम पाहिले होते. सर्वपारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले आहे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या