Sunday, May 19, 2024
Homeजळगावकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ऑनस्क्रीन इव्हॅल्युशन स्कॅनिंग कक्षाचे उद्घाटन

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ऑनस्क्रीन इव्हॅल्युशन स्कॅनिंग कक्षाचे उद्घाटन

जळगाव jalgaon (प्रतिनिधी)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (Poet Bahinabai Chowdhary North Maharashtra University)ऑनस्क्रीन इव्हॅल्युशन स्कॅनिंग (onscreen evolution scanning) कक्षाचे उद्घाटन (Inauguration) कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी Vice Chancellor Pvt. V.L. Maheshwari यांच्या हस्ते झाले.

- Advertisement -

विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर प्रशासकीय तसेच परीक्षा व इतर अनेक विभागात सुरू केलेला आहे. यावर्षी बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. व बी.व्होक. चे प्रथम वर्ष वगळता उर्वरित सर्व पदवी व पदव्युत्तर परीक्षांच्या उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन प्रत्यक्ष विद्यापीठात न होता महाविद्यालयांमध्ये असलेल्या केंद्रांवर ऑनस्क्रीन मूल्यमापन केले जाणार आहे. यापुर्वी काही परीक्षांचे ऑनस्क्रीन मूल्यमापन केले जात होते.

मात्र आता जवळपास सर्व परीक्षांचे उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन संगणकावर प्राध्यापकांना करता येणार आहे. विद्यापीठाअंतर्गत ५० केंद्रांवर ही सुविधा विद्यापीठामार्फत करण्यात आली आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये संगणक, इंटरनेट आणि सीसीटीव्हीची सुविधा आहे. त्या महाविद्यालयांमध्ये उत्तर पत्रिकांचे ऑनस्‍क्रीन मूल्यमापन होईल. त्यापूर्वी विद्यापीठात सर्व उत्तर पत्रिकांचे स्कॅनिंग केले जाईल आणि सर्व्हरद्वारे महाविद्यालयांमधील केंद्रांवर या उत्तर पत्रिका ऑनस्क्रीन मूल्यमापनासाठी पाठविल्या जातील.

या सुविधेमुळे आता महाविद्यालयातील प्राध्यापकांना प्रत्यक्ष विद्यापीठात उत्तर पत्रिका तपासणीसाठी येण्याची गरज राहणार नाही. आपआपल्या महाविद्यालयांमध्ये तपासणी केंद्र असेल तर त्याठिकाणी प्राध्यापक मूल्यमापनाचे काम तसेच वर्गावरील तासिका देखील घेवू शकतील यामूळे वेळेचे बचत देखील होणार आहे.

याशिवाय पुढचे शैक्षणिक सत्र नियमित सुरु होईल. मध्यंतरी कोविडमुळे ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या त्यामुळे ऑनस्क्रीन मूल्यमापन करण्याची गरज भासली नाही. विद्यापीठात या उत्तर पत्रिकांचे स्कॅनिंग करण्याचा प्रारंभ झाला असून कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांच्या हस्ते शुक्रवारी या कक्षाचे उद्घाटन झाले.

या कक्षात ७० संगणक स्कॅनिंगसाठी उपलबध करून देण्यात आले आहे. यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, प्रा. समीर नारखेडे, तसेच के.सी. पाटील, डॉ. मुनाफ शेख, मनोज निळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या