Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedसंततधार पावसामुळे टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

संततधार पावसामुळे टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

त्र्यंबक तालुक्यात सततच्या पावसामुळे टोमॅटो पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे करोना संकटाबरोबर आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते आहे.

- Advertisement -

त्र्यंबक तालुक्यात भात लागवडीबरोबर टोमॅटोची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु यंदा लागवडीनंतर वाढली वाऱ्यासह पाऊस सुरु असल्याने लागवड केलेली पिके कोमेजून गेली आहेत. अनके पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मेहनतीवर पावसाने पाणी फेरले आहे.

(व्हिडीओ स्टोरी : गोकुळ पवार, त्र्यंबकेश्वर)

- Advertisment -

ताज्या बातम्या