Thursday, May 2, 2024
Homeजळगावकंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करा!

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करा!

भडगाव – प्रतिनिधी Bhadgaon

कोविडच्या (Corona) जागतीक महामारीत काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कर्मचार्यांच्या नियुक्ती खंडीत न करता शासनाच्या सेवेत समाविष्ट करण्यात यावे. या मागणीचे निवेदन (Bhadgaon) भडगाव ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी कर्मचार्यांनी भडगाव तहसिलदार सागर ढवळे (Tehsildar Sagar Dhawale) यांना दिले.

- Advertisement -

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केलेले आहे कि, गेल्या १५ महिन्यापासुन कोविड १९ मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी पदावर शासकीय कर्मचारी स्वताच्या जीवाची बाजी लावुन पहिल्या व दुसर्या लाटेशी सामना करीत होते. कर्मचार्यांना कोविड १९ मधील विशेष योगदानाबद्धल शासनाने दखल न घेता, कर्मचार्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. संपुर्ण महाराष्ट्रात लाखापेक्षा अधिक संख्येने कर्मचार्यांवर बेरोजगारीची वेळ आलेली आहे.

जेव्हा स्वत:च्या परिवारातील व्यक्ती रुग्णांच्या सहवासात यायला घाबरत होते. तेव्हा आमच्या परीवाराचा विचार मनात आला नाही. परिवारापासुन सहा सहा महिने लांब राहुन आम्ही आमचे कर्तव्य बजावत राहीलो. त्यामुळे आमच्या या कामाची त्वरीत दखल घ्यावी. आम्हास सेवेत समाविष्ट करुन घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर भडगाव रुग्णालयात कोविड १९ मध्ये काम करणार्या डॉ.रोशनी महाजन, डॉ.गोविंद पवार, शितल अहिरे, रंगीला पावरा, सुनिता पाटील, कल्पना साळुंखे, रिना पवार, शितल मोरे, वैशाली हैडींगे, वार्डबॉय भावेश हाडपे, गौरव धनगर, अमोल निकम, कंचन मोरे, शुभम सिंहले, कमलेश, निखील कासार, डाटा आॅपरेटर अतुल पगारे आदिंच्या सहया आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या