Sunday, May 19, 2024
Homeनाशिकरस्ता दुरुस्तीबाबत भुजबळांच्या आदेशाला अधिकार्‍यांकडून ‘केराची टोपली’

रस्ता दुरुस्तीबाबत भुजबळांच्या आदेशाला अधिकार्‍यांकडून ‘केराची टोपली’

लासलगाव । वार्ताहर | Laslgaon

लासलगाव (Lasalgaon) ते विंचूर (vinchur) या 5 किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात (accidents) होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मतदारसंघाचे आमदार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal) यांनी लासलगाव शहरात यासंदर्भात आढावा बैठकीत (Review meeting) अधिकार्‍यांना सूचना देवून या रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्ट्या करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, भुजबळांची पाठ फिरल्यानंतर अधिकार्‍यांनी याकडे कानाडोळा करत भुजबळांच्या आदेशाला एक प्रकारे वाटाण्याच्या अक्षता दाखविल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये होत आहे.

आशिया खंडातील नावाजलेली बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव शहरापासून नाशिक-औरंगाबाद महामार्गाकडे (Nashik-Aurangabad highway) जाणार्‍या विंचूर (vinchur) येथे जाण्यासाठी 5 किलोमीटर प्रवास करावा लागतो. मात्र हा 5 किलोमीटरचा प्रवास अनेकांच्या जीवावर बेतत आहे. या रस्त्यावरील मंजुळा मंगल कार्यालयासमोर असलेल्या वळणावर दर आठवड्याला एक ते दोन अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे.

अपघातांमध्ये सर्वात जास्त दुचाकीचे प्रमाण अधिक आहे. छगन भुजबळ (chagan bhulbal) यांनी लासलगाव (lasalgaon) शहरात आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department) वरिष्ठ अधिकार्‍यांना यासंदर्भात सूचना करून तातडीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्ट्या भरण्याच्या सूचना केल्या होत्या. ठिकठिकाणी फलक लावण्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी अधिकार्‍यांनी देखील तातडीने काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ‘सरकारी काम आणि चार महिने थांब’ याची अनुभूती थेट माजी उपमुख्यमंत्र्यांना देखील येतांना दिसत आहे.

बैठकीच्या दुसर्‍या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Public Works Department)) अधिकार्‍यांनी तत्परता दाखवत रस्त्याच्या बाजूची वाढलेली झाडे व गवत काढून थोडाफार रस्ता सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही अपघात घडण्याचे प्रमाण जैसे थे आहे. त्यामुळे केवळ रस्ता दुरुस्तीचा देखावा न करता तातडीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्टया भरून रस्ता मोठा करण्याची गरज आहे.

फलक लावण्याची गरज

लासलगाव-विंचूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने या रस्त्यावर फलक लावून जनजागृती करणे गरजेचे आहे. मंजुळा मंगल कार्यालयाच्या बाहेर वळण रस्ता असल्याने या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून वाहनचालक व प्रवाशांकडून केली जात आहे. या रस्त्यावर विंचूरपासून ते लासलगाव पर्यंत जवळपास चार ते पाच वळणे आहे. असे असतांनाही रस्त्याच्या कडेला फलक लावण्याबाबत संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अपघाताची मालिका सुरूच आहे.

आढळलेला फलक मोकळा

विंचूर-लासलगाव रस्त्यावरील अपघात नेहमीचेच झाल्याने सर्वात जास्त डोकेदुखी पोलिसांसाठी ठरत असल्याने पोलीस प्रशासन देखील हतबल झाले आहे. यापूर्वी वळण रस्त्याजवळ रेडियम फलक या ठिकाणी लावलेले होते. मात्र, त्यावर झाडांचा वेल मोठ्या प्रमाणात वाढल्याने तो फलक झाकला गेला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ व पोलिसांनी या ठिकाणी जात तो वेल काढून एकमेव फलक मोकळा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या