Friday, May 3, 2024
Homeनाशिकबँक कर्मचाऱ्यांची दिवाळी

बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी

नाशिक | Nashik

बँक कर्मचाऱ्यांना दरवर्षी १५ टक्के वेतनवाढ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

- Advertisement -

वेतनवाढीविषयी इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात द्विपक्षीय करार झाला. या करारामुळे तीन वर्षांनंतर बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळणार आहे.

हा ११ वा द्विपक्षीय वेतन करार १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू होत आहे. या कराराद्वारे बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनपत्रिकेमध्ये १५ टक्के वाढ दिसून येणार आहे.

वेतनवाढीविषयी तपशीलवार द्विपक्षीय करारावर चार कर्मचारी संघटना आणि चार अधिक संघटना यांच्या मिळून बनलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स समवेत तसेच बँक कर्मचारी सेना महासंघाच्या प्रतिनिधींसमवेत आयबीएने स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

या कराराची अंमलबजावणी केल्यामुळे दरवर्षी बँकांकडून वेतनापायी ७ हजार ८९८ कोटी रुपये जाणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीच्या करारावर मान्यता झाली.

यानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक शहर शाखा येथे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन नाशिक युनिट तर्फे केक कापून आनंद साजरा करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या