Friday, May 3, 2024
Homeजळगावत्या आई-वडीलांच्या पोलीस कोठडीत वाढ

त्या आई-वडीलांच्या पोलीस कोठडीत वाढ

जळगाव – Jalgaon

शहरातील पिंप्राळा हुडकोतील रझा कॉलनीत कनीज फातेमा जावीद अख्तर शेख (वय ११) या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत जन्मदात्या आई नाजीया परवीन जावेद अख्तर व वडील जावेद अख्तर शेख जमालोद्दीन या दोघांविरोधात २८ एप्रिल रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना अटक करण्यात आली होती. २९ एप्रिल रोजी दोघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोघानंा २ मे पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज रविवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना पुन्हा दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित जावेद अख्तर यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या तर संशयित नाजीया हिस शहर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

पिंप्राळा हुडकोतील रझा कॉलनीत कनीज फातेमा जावीद अख्तर शेख (वय ११) हिचा २३ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास संशयास्पद मृत्यू झाला. वडील जावेद शेख यांनी दुसर्या दिवशी म्हणजेच २४ एप्रिल रोजी तिचा दफनविधी केला. ही घटना त्याने कोणालाच सांगितली नाही. नंतर घराला कुलूप लावून पत्नी व दोन्ही मुलींना घेऊन तो गायब झाला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मयत कनिजचे मामा अजहर अली शौकत अली (रा.अमळनेर) यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार होती.

या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी २८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता दफनविधी केलेला मुलीचा मृतदेह उकरुन काढत, त्याचे घटनास्थळावरच तहसीलदारांसमोर शवविच्छेदन करत पंचनामा केला. दोन ते तीन दिवस मुलीला घरात कोंडून ठेवून जेवण न दिल्याने भुकबळीने तिला मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण शवविच्छेदनातून समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी होवून मुलगी कनिज हिच्या मृत्यूस कारणीभूत तिची आई नाजीया व वडील जावेद शेख या दोघांंविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज रविवारी संशयित नाजीया परवीन व जावेद अख्तर शेख या दोघांना न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या