Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; मनपाकडून गंगाघाट परिसरात पाहणी व आवश्यक सुचना

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; मनपाकडून गंगाघाट परिसरात पाहणी व आवश्यक सुचना

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

नाशिकमध्ये काल सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून ३७२१ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील पावसाचे मोठ्या प्रमाणातील पाणी गोदावरी नदीत येत असल्यामुळे गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आज (दि.५ रोजी) रामतीर्थ (रामकुंड) येथे गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पूराचे पाणी होते.याशिवाय सर्वत्र जलमय परिस्थिती झाली आहे. अधिक जोरदार पाऊस झालाच तर यापुढे गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडले जाणार आहे.

- Advertisement -

गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरी नदीला पुराची परिस्थितीचा विचार करून मनपाच्या पंचवटी विभागाीय अधिकारी मदन हरिश्चंद्र,सहा अधिक्षक मंगेश वाघ,राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागाचे सहा.अधिक्षक राजेश सोनवणे,प्रकाश उखाडे,ईश्वर शेंडके,रवी शिंदे,अग्निशमन दलाचे संजय कानडे आदींनी रामकुंड ते तपोवन संगम वस्तीपर्यंत पाहणी करून आवश्यक सुचना दिल्या आहेत.

YouTube video player

दरम्यान,धरणातून विसर्ग होते किंवा नाही मात्र आजूबाजूच्या परिसरातील लहानमोठ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी हे थेट गोदावरी नदीला मिळते आहे.म्हणून गोदावरी नदीच्या पात्रात कमालीची वाढ झाली आहे.गंगाघाटावरील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत काल पाणी पोहोचले असून येथील पातळेश्वर मंदिर हे अर्धे पाण्याखाली गेले आहे.याशिवाय येथील बाजारपेठ परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. म्हणून भाजी विक्रेते,फळ विक्रेतांची दुकाने सुरक्षितस्थळी घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

यापुढे सुध्दा पाऊसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे. पावसात येथे प्रत्येक जण आप आपली काळजी घेत असल्याने रहदारीचे रस्ते व सर्वच रस्ते सामसूम दिसून येत आहे. सध्या येथे होत असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे.

यावेळीसध्या होत असलेल्या जोरदार पाऊस आणि यापुढे जोरदार पाऊस होऊन महापूराची परिस्थिती लक्षात घेऊन नदीच्या काठावर तंबू पाल टाकून वसलेल्या वस्ती हलविण्यात येत आहे.याशिवाय लहानमोठ्या व्यवसायिकांना हलवून सतर्कतेचा इशारा व आवश्यक सुचना दिल्या जात आहे.यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष,मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग,अग्निशमन दल व पोलीस पथक,जिल्हा प्रशासकीय विभागाकडून नदीच्या काठावर लक्ष दिले जात आहे.

ताज्या बातम्या