Thursday, May 2, 2024
Homeनाशिकदुतोंडया मारुतीच्या पायापर्यंत पुराचे पाणी

दुतोंडया मारुतीच्या पायापर्यंत पुराचे पाणी

नाशिक | Nashik

गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच असून आज सकाळपासून १५०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. परंतु व्हिक्टोरिया पुलाखालून २८०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

- Advertisement -

त्यामुळे गोदेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराची ओळख असलेल्या दुतोंडया मारुतीच्या पायाला पाणी लागले आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून यामुळे गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

मागील दोन दिवसापासून शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू आहे. यामुळे धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागले आहे. यामुळे नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या