Friday, May 3, 2024
Homeराजकीयराज्यात महिला अत्याचारांत वाढ

राज्यात महिला अत्याचारांत वाढ

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात मागिल काही दिवसात महिलांवर अत्याचारात वाढ होत आहे. अल्पवयीन मुलींचे विनयभंग होत असून सरकार गप्प असल्याचा गंभीर आरोप भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. मुख्यमंत्री ठाकरे व गृहमंत्री देशमुख यांनी हा शिव छत्रपतींचा महाराष्ट्र असल्याचे त्यांच्या कृतीतून दाखवावे असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

- Advertisement -

वसंतस्मृती कार्यालयार शनिवारी (दि.१४) पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारवर आरोप केले. राज्यात महिला सुरक्षा वार्‍यावर आहे. हे सरकार कधी ताळ्यावर येईल त्याची आम्ही वाट बघतोय. महिला अत्याचाराविरुध्द आणलेला दिशा कायद्याची रुपरेषा स्पष्ट नाही.

मागील दहा दिवसात अल्पवयिन मुलींवरील विनयभंगाच्या घटनेत वाढ होत आहे. ऐरवी छोट्या गोष्टींवर व्यक्त होणारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी या घटनांची साधी दखल घेतली नाहि. क्वारंटाईन सेंटरमध्ये खुलेआम महिलांचि छेड काढली जात आहे.

या ठिकाणी महिला सुरक्षितेसाठी नियमावली देखील जारी केली नाही. फक्त भाषणांमधून महिला सुरक्षा नको. महिला सुरक्षेवर जे घसा कोरडा होउस्तर बोलणार्‍या पक्षांचे आज सरकार सत्तेत असुन त्यांनी ते कृतीतून आता दाखवावे असे त्या म्हणाल्या.

आम्ही प्रत्येक क्वारंटाईन सेंटरला भेट देत असून तेथील अवस्था व उपाय योजना याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या