Thursday, May 2, 2024
Homeनाशिकखाद्यतेलाचे भाव कडाडले

खाद्यतेलाचे भाव कडाडले

लखमापूर । वार्ताहर Lakhmapur

स्थानिक बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलांच्या भावात प्रचंड वाढ झाल्याने सर्व सामान्य जनता परत एकदा महागाईच्या कात्रीत सापडली आहेत.

- Advertisement -

राज्यात परतीच्या पावसाने व बदलत्या वातावरणांचा तेल पिकांवर विपरीत परिणाम झाल्याने खाद्य तेलांचे भाव बाजारपेठेत चांगलेच तापले आहे. लग्नसराईचा कालखंड असल्यामुळे खाद्य तेलाच्या वाढत्या मागणीमुळे स्थानिक बाजारपेठेत खाद्य तेलाच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे नागरिकांना या महागाईचे चटके सहन करावे लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफुल आदी तेलांच्या किंमतीत प्रतिकिलो मागे प्रचंड रुपयांने वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात सोयाबीन तेलाचे भाव प्रतिकिलो 130 ते 135 रुपयांवर गेला आहे. तर पंधरा किलोचा डबा 1900 ते 1950 रुपये इतका भाव आहे. तर शेंगदाणा तेलाचे भाव प्रतिकिलो 155 ते 160 रुपये, तर पंधरा किलोचा डबा 2300 ते 2350 रुपयांला मिळत आहे. तर सूर्यफुल तेलाचा प्रतिकिलो भाव 130 ते 140 रुपये आणि पंधरा किलोचा डबा 1950 ते 2050 रुपये इतका पैसा मोजावा लागत आहे.

एवढे भाव वाढूनही बाजारपेठेत लग्नसराई असल्यामुळे तेल खरेदीची गर्दी कमी होत नाही.पण सर्व सामान्य नागरिकांना मात्र या भावाने तेल खरेदी करणे अवघड होत आहे. या प्रचंड भाव वाढीने सर्व सामान्य किराणा दुकानदार यांना तेल विकतांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कारण ग्राहक तेल खरेदीला ब्रेक लावत आहे, तर हॉटेेल व्यावसायिक या भाव वाढीमुळे पूर्णपणे त्रस्त झाला आहे. खाद्य तेलाच्या या भाव वाढीने सर्व सामान्यांना आर्थिक संकटात लोटले असून शासनाने या संबंधित विचार करून यावर काही उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सध्या खाद्य तेलांचे भाव गगनाला भिडल्यामुळे किरकोळ बाजारपेठेत तेलांची विक्री करणे अत्यंत अवघड ह़ोऊन बसले आहे. मी आठवड्याकाठी जवळजवळ पंधरा किलोचे 100 डबे विकायचो.परंतु आता मात्र आठवड्याकाठी त्यांची सरासरी फक्त 10 ते 15 पंधरा किलोचे तेल डबे विकली जात आहे. त्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना आम्हा किरकोळ विक्रेत्यांना करावा लागत आहे. शासनाने यावर काही उपाययोजना निर्माण करावी. म्हणजे आम्हाला आर्थिक संकटातून बाहेर येता येईल.

मनोज अग्रवाल, संचालक तनिषा सुपर मार्केट, दिंडोरी

- Advertisment -

ताज्या बातम्या