Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाIND vs AUS 4th Test : भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना ड्रॉ, टीम...

IND vs AUS 4th Test : भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना ड्रॉ, टीम इंडियाने मालिका जिंकली

मुंबई | Mumbai

बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 भारतीय संघाने 2-1 अशा आघाडीने नावावर केली. मालिकेतील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला.

- Advertisement -

सोमवारी (13 मार्च) उभय संघांतील हा शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला. तत्पूर्वी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने, तर तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

टीम इंडिया WTC फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 480 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 180 रन्स केल्या. त्यानंतर कॅमरून ग्रीन याने 114 धावांची शतकी खेळी केली. उस्मान आणि ग्रीन या जोडीने 208 धावांची भागीदारी केली. टॉड मर्फी याने नाबाद 41 धावा केल्या.

कॅप्टन स्टीव्हन स्मिथ 38 धावा करुन माघारी परतला. नॅथन लायन याने 34 रन्सचं योगदान दिलं. ट्रेव्हिस हेड याने 32 रन्स केल्या. पीटर हँड्सकॉम्ब याने 17, मिचेल स्टार्क 6 आणि मार्नस लाबुशेन याने 3 धावा केल्या.

शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओवर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “तुमची पापं लपवण्यासाठी…”

एलेक्स कॅरी याला अश्विनने भोपळाही फोडु दिला नाही. तर कुहनेमॅन शून्यावर नाबाद परतला. टीम इंडियाडून अश्विनशिवाय मोहम्मद शमी याने 2, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

‘निरमा गर्ल’च्या पोस्टरने अमित शाहांचं हैदराबादमध्ये स्वागत; पोस्टरवर नारायण राणेंसह अर्जुन खोतकरांचंही नाव… नेमकं प्रकरण काय?

- Advertisment -

ताज्या बातम्या