मुंबई | Mumbai
सध्या भारत-ऑस्ट्रेलिया संघादरम्यान कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकत मालिकेत बरोबरी केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेड यांच्यातील स्लेजिंगचा किस्सा चांगलाच चर्चेत आला होता. अॅडिलेड कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ट्रॅविस हेडला बाद केल्यावर सिराजने हातवारे करुन विकेट्सचा जल्लोष साजरा केला. त्यावेळी ट्रॅव्हिस हेडहीला रागाने काहीतरी बोलताना दिसला होता. या घटनेवर आयसीसीने दोन्ही खेळाडूंना कठोर शिक्षा सुनावली आहे.
अॅडिलेड कसोटी सामन्यादरम्यान ट्रॅविस हेडसोबतचा पंगा मोहम्मद सिराजसाठी चांगलाच महागडा पडलाय. दोघांच्या वर्तनाची दखल आयसीसीने घेतली असून त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. ट्रॅव्हिस हेडला बाद केल्यानंतर सिराजने त्याला मैदान सोडण्यास सांगितले. त्यावेळी ट्रॅव्हिस हेडही त्याला रागाने काहीतरी बोलताना दिसला होता. आयसीसीने आचार सहिंतेच उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला कलम २.५ अंतर्गत दोषी ठरवले आहे. त्यामुळे डिमेरिट पॉइंट्स भारतीय गोलंदाजाला मॅच फीच्या २० टक्के रक्कम दंडाच्या रुपात भरावी लागणार आहे. दुसरीकडे ट्रॅविस हेडला २.१३ अंतर्गत दोषी ठरवल्यामुळे त्याच्या नावे फक्त एक डिमेरिट पॉइंट्स जमा झाला आहे. दोन्ही खेळाडूंनी आपली चूक मान्य केली आहे.
दरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपला गुन्हा कबूल केलाय. आपण गैरवर्तन केल्याचे त्यांनी मान्य केलेय. तसेच या दोघांवर पंचानी दंड सुनावला असून त्या दोघांनी तो स्वीकारलाय. सिराज आणि हेड यांच्यातील वादावर ट्रॅव्हिस हेडने प्रतिक्रिया दिलीय. त्याने सिराजला चांगली गोलंदाजी केल्याचे म्हटले होते.