Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाIND vs BAN 1st Test : भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय!

IND vs BAN 1st Test : भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय!

दिल्ली | Delhi

भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय संघाने तब्बल २८० धावांनी बांगलादेशचा पराभव केला.

- Advertisement -

भारताने बांगलादेशला विजयासाठी ५१३ धावांचे आव्हान दिले होते आणि २३४ धावांवर बांगलादेशला ऑल आऊट करत कसोटी मालिकेत १-० ने आघाडी मिळवली आहे.

रविचंद्रन अश्विनच्या ६ विकेट्सच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात एकतर्फी दबाव आणला. आश्विनव्यतिरीक्त भारताकडून फलंदाजीत रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी आपली चमक दाखवली. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, सिराज यांनीही आपला दमखम दाखवला.

हे हि वाचा : शरद पवार गटाचा श्रीगोंदा मतदारसंघात उमेदवार फायनल?

बांगलादेशला हरवून भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने १९३२ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून भारताने एकूण ५८० सामने खेळले आहेत.

९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघाने पराभवापेक्षा जास्त विजयाचा आकडा गाठला आहे. बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमधील १७९वा विजय संपादन केला आहे. तर, संघाला १७८ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

हे हि वाचा : आमदार काळेंचे गुन्हेगारांना बळ?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या