Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाइंग्लंडने जिंकला टॉस, भारताची बॅटिंग

इंग्लंडने जिंकला टॉस, भारताची बॅटिंग

पुणे । Pune

भारत आणि इंग्लंड संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संपूर्ण मालिका प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळली जाणार आहे.

- Advertisement -

आजच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून भारतीय वनडे संघात कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णाने पदार्पण केले आहे.

पुणे येथे भारत आणि इंग्लंड संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर संपूर्ण मालिका प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळली जाणार आहे.

आजच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यातून भारतीय वनडे संघात अष्टपैलू कृणाल पांड्या आणि फिरकीपटू प्रसिद्ध कृष्णाने पदार्पण केले आहे. कृणाल भारतीय टी-20 संघाचा भाग होता तर प्रसिद्धचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे.

शिवाय, आजच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियासाठी रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी सलामीला उतरेल, तर श्रेयस अय्यर चौथ्या आणि केएल राहुल पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरेल. शिवाय, कुलदीप यादवचा देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या