Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाबर्मिंगहॅम कसोटीत भारताचा दारुण पराभव; मालिका अनिर्णीत

बर्मिंगहॅम कसोटीत भारताचा दारुण पराभव; मालिका अनिर्णीत

बर्मिंगहॅम । Birmingham

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना १ जुलैपासून बर्मिंगहॅममधील (Birmingham) एजबस्टन (Edgbaston) क्रिकेट स्टेडियमवरती खेळवल गेला.आज पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ११९ धावांची तर भारताला सात बळींची आवश्यकता होती. भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद २४५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताकडे ३७७ धावांची आघाडी आली होती. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी करत सात गडी राखत विजय मिळवला. त्यामुळे ही मालिका २-२ अशी बरोबरी सुटली आहे…

- Advertisement -

भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्रॅवली (४६) व अॅलेक्स लीज (५६) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. यानंतर जसप्रीत बुमराहने (jasprit Bumrah) जॅक याला बाद केले. तर अॅलेक्स धावचीत झाला. त्यानंतर मात्र जो रुट ( Jo Root) आणि जॉनी बेअरस्टो (Johnny Bairstow) यांनी तुफान फटकेबाजी करून आपआपली शतके पूर्ण करत संघाला एक तगडा विजय मिळवून दिला. जो रूट १७३ चेंडूंत १९ चौकार व १ षटकारासह १४२ धावांवर तर जॉनी बेअरस्टो १४५ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह ११४ धावांवर नाबाद राहिला.

दरम्यान, भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. १३२ धावांची आघाडी मिळवूनही भारताला दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा (६६) व रिषभ पंत ( ५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २४५ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या