Friday, May 3, 2024
Homeक्रीडाAjaz Patel : एकाच डावात भारताच्या संपूर्ण संघाला तंबूत पाठवणारा 'एजाज पटेल'...

Ajaz Patel : एकाच डावात भारताच्या संपूर्ण संघाला तंबूत पाठवणारा ‘एजाज पटेल’ नेमका आहे कोण?

भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) संघात शुक्रवारपासून (३ डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याचा शनिवारी (४ डिसेंबर) दुसरा दिवस आहे.

दरम्यान न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने वानखेडे मैदानावर मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. या सामन्यात एजाजने एका डावात १० बळी घेत दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. एका डावात १० बळी घेणारा एजाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला.

- Advertisement -

मुंबईमध्ये २१ ऑक्टोबर १९८८ रोजी जन्मलेला पटेल वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत भारतामध्येच होता. पण नंतर कुटुंबासोबत न्यूझीलंडला स्थायीक झाला. सुरुवातीला तो डावखुरा फास्ट बॉलर होता, पण काही काळानंतर त्याने स्पिन बॉलिंग करायला सुरुवात केली.

एजाज पटेलने २०१८ साली कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं, पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात एजाजने ७ विकेट घेतल्या आणि न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. एजाज पटेल आपल्या पहिल्याच कसोटीमध्ये मॅन ऑफ द मॅच होता.

एजाज पटेलने आतापर्यंत ११ कसोटीमध्ये ३०.५१ च्या सरासरीने ३३ विकेट घेतल्या आहेत. याआधी कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीमध्येही एजाज पटेलने भारताच्या हातचा विजयाचा घास हिरावून घेतला.

कानपूर कसोटीमध्ये भारताला विजयासाठी एका विकेटची गरज होती, पण एजाज पटेलने रचीन रविंद्रच्या मदतीने अखेरच्या विकेटसाठी ५२ बॉल किल्ला लढवला आणि न्यूझीलंडला मॅच ड्रॉ करण्यात यश आलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या