Friday, May 17, 2024
Homeक्रीडाIND vs PAK : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, विराटची ऐतिहासिक खेळी

IND vs PAK : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, विराटची ऐतिहासिक खेळी

दिल्ली | Delhi

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) आक्रमक खेळीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार गडी राखून धुव्वा उडवला.

- Advertisement -

पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी १६० धावांचे आव्हान ठेवले होते. भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण त्यानंतर हार्दिक आणि कोहली यांनी धडाकेबाज फटकेबाजी केली व त्यामुळेच भारताला विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दमदार विजय मिळवता आला. विराटने यावेळी तुफानी फटकेबाज केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पंड्या यावेळी ४० धावांवर बाद झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या