Wednesday, January 7, 2026
Homeक्रीडाIND vs SA : भारताचा 7 विकेट्सने विजय; दक्षिण आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम

IND vs SA : भारताचा 7 विकेट्सने विजय; दक्षिण आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम

धर्मशाळा | Dharamshala

दुसर्‍या टी 20 सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने फ्लॉप कामगिरी करणार्‍या भारताने धर्मशालेतील तिसर्‍या आणि निर्णायक सामन्यात पलटवार केला आहे. भारतानेे धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 118 धावांचं आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान 25 बॉलआधी पूर्ण केले. भारताने 15.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 120 धावा केल्या. भारताने यासह हा सामना जिंकला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. तसेच भारताने या विजयासह 2015 मधील पराभवाची परतफेड केली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 2015 साली याच मैदानात पराभूत केले होते.

YouTube video player

दक्षिण आफ्रिकेचं पॅकअप
या मालिकेत भारताच्या बाजूने सलग दुसर्‍यांदा नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडले. भारतीय गोलंदाजांनी कर्णधार सूर्याच्या या निर्णयाला योग्य ठरवले. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 117 रन्सवर ऑलआऊट केले. भारताने दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या 100 धावा तरी होणार की नाहीत? अशी स्थिती होती. मात्र कर्णधार एडन मारक्रम याने संकटमोचकाची भूमिका बजावली आणि दक्षिण आफ्रिकेची लाज राखली.
एडनने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक 61 धावा केल्या. तर डोनोवेन फेरारा याने 20 तर एनरिच नॉर्खिया याने 12 धावांचं योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतासाठी अर्शदीप सिंह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे याने 1-1 विकेट घेतली.

भारताची चाबूक सुरुवात
अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने धावांचा पाठलाग करताना भारताला आक्रमक सुरुवात दिली. या दोघांनी 60 धावांची भागीदारी केली.त्यानंतर अभिषेक शर्मा 35 धावांवर आऊट झाला. त्यानंतर शुबमन आणि तिलक वर्मा आणि शुबमन या दोघांनी 38 चेंडूत 32 धावांची भागीदारी केली. शुबमन 28 बॉलमध्ये 28 रन्स करुन आऊट झाला.
तिलक आणि सूर्यकुमार यादव या जोडीने 18 बॉलमध्ये 17 रन्स केल्या. सूर्यकुमार भारताला लवकर विजयी करण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. सूर्याने 12 धावा केल्या. तर तिलक आणि शिवम दुबे या जोडीने भारताला विजयी केले. तिलकने नाबाद 25 आणि शिवमने नॉट आऊट 10 रन केले. दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एन्गिडी, मार्को यान्सेन आणि कॉर्बिन बॉश या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

ताज्या बातम्या

Ridhima Pathak : ‘देश आधी, लीग नंतर!’ भारतीय प्रेझेंटर रिद्धिमा पाठकची...

0
दिल्ली । Delhi भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण वळणावर आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांत दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र होताना...