Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशकेंद्र सरकारकडून गहू निर्यातीवर सशर्त बंदी; काय आहे कारण?

केंद्र सरकारकडून गहू निर्यातीवर सशर्त बंदी; काय आहे कारण?

नवी दिल्ली । New Delhi

देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे.

- Advertisement -

देशांतर्गत बाजारात गव्हाच्या वाढलेल्या किमतीमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काही अटींसह गव्हाची निर्यात सुरू ठेवण्यात येणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय आधीच करार झालेल्या निर्यातीसाठी लागू होणार नाही.

राणादा अन् पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; पहा साखरपुड्याचे खास फोटो

सरकारने त्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. देशाची एकूण अन्न सुरक्षेचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि शेजारी तसेच इतर असुरक्षित देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

भारत सरकार शेजारी आणि इतर असुरक्षित विकसनशील देशांच्या अन्न सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यांचा जागतिक गह बाजारातील अचानक बदलांमुळे विपरित परिणाम होतो आणि पुरेसा गव्हाचा पुरवठा होऊ शकत नाही, असे केंद्र सरकारने अधिसूचनेत म्हटले आहे.

पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा ‘आर्ची’चे खास फोटो

- Advertisment -

ताज्या बातम्या