Tuesday, January 6, 2026
Homeदेश विदेशबांगलादेशात अल्पसंख्यकांविरुध्द हिंसाचाराच्या २९०० हून अधिक घटना; परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते म्हणाले, देशात...

बांगलादेशात अल्पसंख्यकांविरुध्द हिंसाचाराच्या २९०० हून अधिक घटना; परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते म्हणाले, देशात कायदा-सुव्यवस्था राखणे…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारात हिंदूंवर अत्याचार करण्यात येत आहेत. मागच्या आठवड्यात दोन हिंदू युवकांची हत्या करण्यात आली. या संदर्भात बांगलादेशातील ढासळती कायदा-सुव्यवस्था आणि अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणारे हल्ले यावर भारत सरकारने शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या मयमनसिंह येथे दीपू चंद्र दास या हिंदू युवकाची करण्यात आलेली निर्घृण हत्या अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत, भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम सरकारला या प्रकरणी तातडीने न्याय देण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या आठवड्यात राजधानी ढाकापासून १०० किमी अंतरावर असलेल्या मयमनसिंग येथे जमावाने ३० वर्षीय दीपू चंद्र दास नावाच्या कामगाराची हत्या केली होती. त्याला मारहाण करतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. दीपूचा नग्नावस्थेतील मृतदेह झाडाला बांधून आग लावण्यात आली होती. इतक्या क्रूर पद्धतीने हत्या करताना जमाव आनंद साजरा करताना दिसत होता.

- Advertisement -

अल्पसंख्याकांविरुद्ध सुरू असलेला हिंसाचार गंभीर चिंतेचा विषय
यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत रणधीर जयस्वाल म्हणाले, “बांगलादेशमध्ये हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्धांसह अल्पसंख्याकांविरुद्ध सुरू असलेला हिंसाचार गंभीर चिंतेचा विषय आहे. मयमनसिंगमध्ये एका हिंदू तरूणाला अतिशय क्रूर पद्धतीने मारण्यात आले. या निर्घृण हत्येचा आम्ही निषेध करतो. या घटनेतील गुन्हेगारांना शिक्षा होईल, अशी अपेक्षा करतो.”

YouTube video player

हे ही वाचा: भाजपाने इतिहास रचला! ‘या’ पालिकेत विराजमान झाला पहिला महापौर, ४५ वर्षांनी जिंकली महापालिका

हिंसाचाराच्या तब्बल २९०० हून अधिक घटनांची नोंद
रणधीर जायसवाल यांनी यावेळी एका धक्कादायक आकडेवारीचा दाखला दिला. बांगलादेशातील अंतरिम सरकारच्या कार्यकाळात हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्ध अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या तब्बल २,९०० हून अधिक घटनांची नोंद विविध स्वतंत्र स्त्रोतांकडून झाली आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध पसरलेली शत्रुत्वाची भावना आणि हिंसाचार हा केवळ चिंतेचा विषय नसून, तो गंभीर आंतरराष्ट्रीय प्रश्न बनत असल्याचे भारताने सांगितले.

१२ डिसेंबर रोजी बांगलादेशमध्ये बंडखोर विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान हादी याचा सिंगापूरमधील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचाराची लाट उसळली. जुलै २०२४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात उसळलेल्या जनआंदोलनात शरीफ ओस्मान हादी याची महत्त्वाची भूमिका होती.

भारताने बांगलादेशला स्पष्ट शब्दात बजावले आहे की, आपल्या देशात कायदा-सुव्यवस्था राखणे आणि अल्पसंख्याकांना सुरक्षा पुरवणे ही पूर्णपणे तेथील अंतरिम सरकारची जबाबदारी आहे. मयमनसिंह येथील हत्येतील दोषींना लवकरात लवकर न्यायच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे.

बांगलादेशमधील निष्पक्ष निवडणुकांना समर्थन
बांगलादेशातील लोकशाहीला पाठिंबा देत असताना रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले, बांगलादेशमधील लोकांशी भारताचे घट्ट संबंध आहेत. बांगलादेशमध्ये स्थिरता आणि शांतात नांदावी, यासाठी आमचा पाठिंबा आहे. आम्ही बांगलादेशमधील निष्पक्ष, मुक्त निवडणुकांना समर्थन देतो. शांततेच्या वातावरणात निवडणुका पार पडाव्यात.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...