Tuesday, February 3, 2026
Homeदेश विदेशIndia-US Tariff: ग्रेट डील! अमेरिकन टॅरिफवरुन भारताला मोठा दिलासा; २५ टक्क्यांवरुन १८...

India-US Tariff: ग्रेट डील! अमेरिकन टॅरिफवरुन भारताला मोठा दिलासा; २५ टक्क्यांवरुन १८ टक्क्यांवर आणला टॅरिफ

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राबवण्यासाठी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ 1 ऑगस्ट 2025 पासून आकारण्यास सुरुवात केली होती. मात्र आता डोनाल्ड ट्रम्प सरकारने माघार घेतल्याचे दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील टॅरिफ कमी केला आहे. या व्यापार करारामुळे भारत-अमेरिका संबंधांत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भातही भारताने महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे मान्य केले आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर टॅरिफ कमी केल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

ट्रम्प यांची सोशल मिडियावर पोस्ट
डोनाल्ड ट्रम्प यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले. ते माझ्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक आहेत आणि त्यांच्या देशाचे एक शक्तिशाली नेते आहेत. आम्ही व्यापार, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासह अनेक विषयांवर चर्चा केली. त्यांनी (नरेंद्र मोदी) रशियन तेल खरेदी करणे थांबवण्यास आणि अमेरिका व संभाव्यतः व्हेनेझुएलाकडून अधिक तेल खरेदी करण्यास सहमती दर्शवली आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

- Advertisement -

ट्रम्प यांनी पुढे म्हंटले आहे की, भारताच्या सहमतीमुळे युक्रेनमधील युद्ध संपण्यास मदत होईल. कारण या युद्धामुळे दर आठवड्याला हजारो लोक मरत आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेल्या मैत्रीसाठी तसेच त्यांच्या विनंतीनुसार आम्ही अमेरिका आणि भारत यांच्यात त्वरित लागू होणाऱ्या एका व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे, ज्या अंतर्गत अमेरिका परस्पर शुल्क कमी करून ते 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.

YouTube video player

ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक करताना म्हटले की, “पंतप्रधान मोदी आणि मी, आम्ही दोघेही केवळ बोलत नाही तर प्रत्यक्ष काम करून दाखवतो. बहुतेक नेत्यांच्या बाबतीत असे म्हणता येत नाही.” या कराराने केवळ व्यापारच नाही, तर जागतिक स्तरावर भारताचे धोरणात्मक महत्त्वही अधोरेखित केले आहे.

भारत-अमेरिका करारातील महत्वाचे मुद्दे
ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये व्यापार करारासंदर्भात अनेक मुद्दे होते. भारताने अद्याप या व्यापार कराराला दुजोरा दिलेला नाही. ट्रम्प यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
भारत अमेरिकन निर्यातीवरील आयात शुल्क कमी करून शून्य करेल.
अमेरिका ‘रिसिप्रोकल टॅरिफ’ शुल्क 25% वरून 18 % पर्यंत कमी करेल.
ट्रम्प यांनी दावा केला की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल.
भारत अमेरिकेकडून तेलाची खरेदी वाढवेल. भारत संभाव्यतः व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्यास सुरुवात करू शकतो.
ट्रम्प म्हणाले की, भारताने ऊर्जा, कृषी, कोळसा आणि तंत्रज्ञान यासह अनेक अमेरिकन वस्तूंवर 500 अब्ज डॉलर्स खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे.
ट्रम्प यांनी दावा केला की, या करारामुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबण्यास मदत होईल.

मोदींनी मानले आभार
या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “माझे प्रिय मित्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी आज संवाद साधून आनंद झाला. ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवरील शुल्क 18 टक्क्यांवर आणण्याच्या निर्णयाबद्दल भारतातील 1.4 अब्ज नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार.” भारत आणि अमेरिका या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि लोकशाही देशांनी एकत्र काम केल्यास दोन्ही देशांना त्याचा मोठा फायदा होईल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संजय

Sanjay Raut: विमान अपघाताबाबात संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, “ऑपरेशन...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे...