कानपूर | Kanpur
भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) संघांमध्ये कानपूर (Kanpur) येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर दुसरा निर्णायक कसोटी सामना (Test Match) खेळविण्यात येत आहे. २७ सप्टेंबरपासून सामन्याला सुरुवात झाली असून, पहिल्या दिवसापासून सामन्यावर पावसाचे सावट आहे.
हे देखील वाचा : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ राज्य सरकारविरोधात करणार बेमुदत धरणे आंदोलन; नेमकं कारण काय?
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या (Rain) व्यत्ययामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला आहे. दुपारपर्यंत पाऊस विश्रांती घेईल अशी आशा होती. मात्र, दुसऱ्या दिवशी पावसाने अजिबात विश्रांती घेतली नाही. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होईल अशी क्रिकेट चाहत्यांना आशा आहे.
हे देखील वाचा : १ ऑक्टोबरपासून ‘हे’ नियम बदलणार, खिशावर होणार परिणाम
दरम्यान, भारतीय संघाने चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २८० धावांनी दणदणीत विजय संपादन करून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. भारतीय संघ निर्भेळ यशासाठी सज्ज असणार आहे. तर बांगलादेश संघाला बरोबरी साधण्यासाठी विजय अनिवार्य असणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
सलिल परांजपे, नाशिक.