मुंबई | Mumbai
आयसीसी महिला टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये (ICC Women’s T20 World Cup ) वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना सराव सामन्यात पराभवाची धूळ चारून भारतीय महिला संघाने विश्वचषक विजयाची आपली दावेदारी अधिक मजबूत केली आहे. त्यानंतर आता भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना न्यूझीलंडविरूध्द (India vs New Zealand) शुक्रवार (दि.०४) ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता खेळविण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : भाजपला दे धक्का! इंदापुरात शरद पवारांनी भाकरी फिरवली; हर्षवर्धन पाटील ‘तुतारी’ फुंकणार?
महिला टी २० विश्वचषक स्पर्धेची ही नववी आवृत्ती असणार आहे.तर भारतीय महिला संघाची (Indian Women’s Team) टी २० विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. भारतीय संघाने केवळ १ वेळा अंतिम सामन्यात धडक मारली आहे.तर दोन वेळा उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, यंदा भारतीय महिला संघाला विश्वविजेतेपदाचा बहुमान पटकावण्याची संधी असणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत कौरकडे तर न्यूझीलंडची कमान सोफी डिझाईनकडे असणार आहे.
हे देखील वाचा : Rohit Sharma : कर्जत जामखेडमध्ये रोहित शर्माचा मराठीतून संवाद; म्हणाला, ”पुढचा…”
विशेष म्हणजे न्यूझीलंड संघाची कर्णधार सोफी डिवाईनचा हा अखेरचा विश्वचषक असणार आहे. त्यामुळे आपल्या कर्णधाराला विजयी निरोप देण्यासाठी न्यूझीलंडचा प्रयत्न असणार आहे. भारत आणि न्यूझीलंड महिला संघांमध्ये आतापर्यंत २७ टी २० सामने खेळविण्यात आले आहेत. यात भारताने (India) १४ तर न्यूझीलंडने १० सामन्यात विजय संपादन केला आहे. तर १ सामना टाय आणि २ सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये १२ सामने खेळविण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने २ तर न्यूझीलंड संघाने ९ सामन्यात विजय संपादन केला आहे.
हे देखील वाचा : Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं नवं गीत लाॅन्च; उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा
दरम्यान, विशेष म्हणजे भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे सराव सामन्यात मधल्या फळीतील फलंदाज जेमिमा राॅडरिक्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष या फलंदाजांनी (Batsmen) चांगली कामगिरी केली होती. दुसरीकडे भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे हरमनप्रीत कौर स्मृती मंधाना, शेफाली वर्मा या अनुभवी खेळाडूंकडून भारतीय महिला संघाला चांगली कामगिरी अपेक्षित असणार आहे. तर गोलंदाजीत दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर आशा शोभना हे गोलंदाज लयीत आहेत. तसेच न्यूझीलंडविरूध्द आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचे भारतीय संघासमोर आव्हान असणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा