Wednesday, February 19, 2025
Homeक्रीडाRohit Sharma : कर्जत जामखेडमध्ये रोहित शर्माचा मराठीतून संवाद; म्हणाला, "पुढचा…"

Rohit Sharma : कर्जत जामखेडमध्ये रोहित शर्माचा मराठीतून संवाद; म्हणाला, “पुढचा…”

अहमदनगर | Ahmednagar

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या पुढाकाराने आज नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील राशीन (Rashin) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकादमी आणि क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्यास भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा उपस्थित होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना रोहितने त्याच्या शैलीत मराठीतून संवाद साधला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं नवं गीत लाॅन्च; उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा

यावेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला की, “अलीकडेच आम्ही आमचे मोठे लक्ष्य गाठत भारतासाठी ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकला. विश्वचषक जिंकल्यावर माझ्या जीवात जीव आला. पण, मी आज इथे कशासाठी आलोय हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. क्रिकेट हा खेळ सर्वांनाच आवडतो. इथे आम्ही क्रिकेट अकादमी सुरू करतो आहोत. मला खात्री आहे की, पुढचा यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, जसप्रीत बुमराह सगळे इथूनच येतील. माझे मराठी एवढेच होते. तुम्ही सर्वांनी भरपूर प्रेम दिल्याबद्दल आभार. इथे पुन्हा येण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन”, असे त्याने म्हटले.

हे देखील वाचा : Sanjay Raut : महाविकास आघाडीचे जागावाटप कधी जाहीर होणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी कर्जत जामखेडकरांनी (Karjat Jamkhed) मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी रोहितने देखील चाहत्यांना नाराज न करताना त्यांचा उत्साह वाढवला. तसेच रोहितला बघण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी हजेरी लावली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या