Sunday, October 6, 2024
Homeब्रेकिंग न्यूजWomen’s T20 World Cup : आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना; कुणाचे पारडे जड?

Women’s T20 World Cup : आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना; कुणाचे पारडे जड?

मुंबई | Mumbai

आयसीसी महिला टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये (ICC Women’s T20 World Cup) आज (रविवारी) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघांमध्ये सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होणार असून भारतीय संघाची धुरा हरमनप्रीत कौरकडे (Harmanpreet Kaur) तर पाकिस्तानची धुरा फातिमा सनाकडे (Fatima Sana) असणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Women’s T20 World Cup : उद्या भारत-न्यूझीलंड भिडणार; कोण मारणार बाजी?

पाकिस्तान संघाने (Pakistan Team) शारजा येथे खेळविण्यात आलेल्या श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात शानदार विजय संपादन केला आहे. त्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाला पराभूत करून विजयी मोहीम कायम राखण्यासाठी पाकिस्तानचा प्रयत्न असणार आहे.दुसरीकडे न्यूझीलंडविरूध्द सलामी लढतीत ५८ धावांनी दारूण पराभव स्वीकारावा लागलेल्या भारतीय संघासाठी हा सामना करो वा मरो असा असणार आहे.

हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “पहिल्या यादीत मला उमेदवारी न दिल्यास…”; शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार खोसकरांचा काँग्रेसला इशारा

तर पाकिस्तानविरुद्ध पराभव झाल्यास भारतीय संघाला (Indian Team) स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे. भारत आणि पाकिस्तान महिला संघांमध्ये १३ टी २० सामने खेळविण्यात आले आहेत. यात पाकिस्तान संघाने ३ तर भारतीय संघाने १० सामन्यात विजय संपादन केला आहे. तसेच टी २० विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये ७ सामने खेळविण्यात आले आहेत. त्यामध्ये भारताने ५ तर पाकिस्तान संघाने २ सामन्यात विजय संपादन केला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती

दरम्यान, पहिल्या साखळी सामन्यातील न्यूझीलंडविरूध्दचा (New Zealand) पराभव मागे सारून नव्या उमेदीने मैदानावर उतरण्यासाठी भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंड विरूध्द पहिल्या सामन्यातील पराभवामुळे भारतीय महिला संघाचा नेट-रनरेट खराब झाला आहे. तर उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला श्रीलंका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियाविरुध्द विजय संपादन करावा लागणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या