Friday, May 3, 2024
Homeक्रीडाIND vs SA : भारतासमोर २७९ धावांचे आव्हान, हेंड्रीक्स-मार्करमची शतकी भागीदारी

IND vs SA : भारतासमोर २७९ धावांचे आव्हान, हेंड्रीक्स-मार्करमची शतकी भागीदारी

मुंबई | Mumbai

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी (9 ऑक्टोबर) खेळला जात आहे. जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथे खेळल्या गेलेल्या या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

- Advertisement -

या सामन्यात पाहुण्या संघाने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 6 गडी गमावत 278 रन स्कोरबोर्डवर लावले आहेत. ज्यामुळे आता भारताला विजयासाठी 279 रन करायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून मार्करम आणि रीझा हेंड्रीक्स यांनी दमदार अशी अर्धशतकं ठोकत दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. ज्यामुळे त्यांनी 278 धावापर्यंत मजल मारली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या