Friday, May 17, 2024
Homeक्रीडाIND vs SA : भारताला मालिका विजयाची संधी

IND vs SA : भारताला मालिका विजयाची संधी

मुंबई | Mumbai

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India and South Africa) यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (ODI Series) तिसरा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर (Arun Jaitley Ground) खेळविण्यात येणार असून दुपारी १.३० वाजता हा सामना सुरु होईल …

- Advertisement -

भारत आणि दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. कर्णधार शिखर धवनकडून (Shikhar Dhawan) भारताला मोठी खेळी अपेक्षित आहे. याशिवाय सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) सुद्धा मोठी खेळी करण्यासाठी संघर्ष करत असून त्यालाही मोठ्या खेळीची संधी आहे.

तसेच भारतीय संघासाठी विशेष म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) संजू सॅमसन (Sanju Samson) फॉर्मात आले आहेत. उपकर्णधार श्रेयस अय्यरही (Shreyas Iyer) सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.

तर गोलंदाजीत शार्दूल ठाकूर (Shardul Thakur)मोहंमद सिराज (Mohammad Siraj) चांगली कामगिरी करत असून त्यांना इतर गोलंदाजही चांगली साथ देत आहेत. याशिवाय आजच्या सामन्यावर पावसाचे (Rain) सावट असून मागील काही दिवसांपासून दिल्लीत सातत्याने पाऊस पडत आहे.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या