Thursday, July 4, 2024
Homeक्रीडाIND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात महामुकाबला; कोण होणार विश्वविजेता?

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात महामुकाबला; कोण होणार विश्वविजेता?

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

आयसीसी टी २० विश्वचषक (ICC T20 World Cup) २०२४ चा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India and South Africa) यांच्यात होणार आहे.दक्षिण आफ्रिकेने आयसीसी स्पर्धेमध्ये प्रथमच विश्वचषक फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर भारतीय संघाने (Team India) २०१४ साली आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.मात्र, या सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर आता तब्बल १० वर्षांनंतर भारतीय संघ अंतिम फेरीत खेळणार आहे.

भारतीय संघाने माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली २००७ मध्ये टी २० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर आता १७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघाला रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात इतिहास रचण्याची संधी असणार आहे.तसेच दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज असणार आहे.तर दक्षिण आफ्रिकेला एडम मार्करमच्या (Adam Markram) नेतृत्वात पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावण्याची संधी असणार आहे.

हे देखील वाचा : IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात आज लढत; कुणाला मिळणार उपांत्य फेरीचे तिकीट?

दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत दोन्ही संघ यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये अद्याप अपराजित आहेत. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात सलग ७ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाने एडम मार्करमच्या नेतृत्वात सलग ८ सामन्यात विजय संपादन केला आहे. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानविरुद्ध ९ गडी राखून दणदणीत विजय संपादन करून अंतिम फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ६८ धावांनी दणदणीत विजय संपादन करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आज या दोन्ही संघांमध्ये टी २० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे.

भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे सुर्यकुमार यादव, रोहित शर्मा, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, लयीत आहेत. तर गोलंदाजीत अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदिपसिंग, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव फॉर्मात आहेत. त्यामुळे आता अंतिम सामन्यात आपली विजयी लय कायम राखण्यासाठी भारत सज्ज असणार आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाबद्दल बोलायचे झाल्यास क्विंटन डिकॉक, एडम मार्करम, रिझा हेंड्रिक्स, हेन्री क्लासेन, डेव्हिड मिलर असे आक्रमक फलंदाज संघात आहेत. तर गोलंदाजीत मार्को यानसेन, तबरेझ शम्सी, कगिसो रबाडा, एनरिक नॉरकिया, केशव महाराज, हे सर्वजण संघाला सातत्याने बळी मिळवून देत सामन्याला कलाटणी देत आहेत.त्यामुळे दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये आजचा अंतिम सामना होत असून दोघांमध्ये ‘काटे की टक्कर’ होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : SA vs AFG : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय

दरम्यान, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २६ सामने खेळविण्यात आले आहेत. यात भारतीय संघाचा वरचष्मा राहिला आहे. भारताने १४ आणि दक्षिण आफ्रिका संघाने ११ सामन्यांत विजय संपादन केला आहे.तर १ सामना पावसामुळे (Rain) रद्द करण्यात आला आहे.तसेच टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये ६ सामने खेळविण्यात आले असून यात भारतीय संघाने ४ आणि दक्षिण आफ्रिकेने २ विजय मिळविले आहेत. तसेच मागील ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास दक्षिण आफ्रिकेने ३-२ अशा फरकाने विजय संपादन केला आहे.याशिवाय सामन्याच्या दिवशी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तविले आहे. जर पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर ३० जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, तरी देखील सामना न झाल्यास दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघाला संयुक्त विजेतेपद दिले जाईल.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

.

- Advertisment -

ताज्या बातम्या