Friday, December 13, 2024
Homeक्रीडाIND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात आज लढत; कुणाला मिळणार उपांत्य फेरीचे...

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात आज लढत; कुणाला मिळणार उपांत्य फेरीचे तिकीट?

नवी दिल्ली | New Delhi

आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये (ICC T20 World Cup) आज गुरुवारी (दि.२७) रोजी दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळविण्यात येणार आहे.यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने (Team India) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात चमकदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड विरूध्द शानदार विजय संपादन केला आहे. तसेच कॅनडा विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्यामुळे भारतीय संघाने गुणतालिकेत ७ गुणांसह अव्वल स्थान निश्चित केले होते. ही विजयी लय कायम राखताना भारतीय संघाने सुपर ८ मध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध शानदार विजय संपादन करून थाटात उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे. आता इंग्लंड विरुद्ध विजय संपादन करून तिसरी अंतिम फेरी गाठण्याची संधी भारतीय संघाकडे असणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : SA vs AFG : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय

दुसरीकडे यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडच्या कामगिरीवर नजर टाकल्यास सातत्याचा अभाव दिसून आला आहे.साखळी फेरीत स्कॉटलंड विरूध्द झालेला पहिला सामना पावसामुळे (Rain) रद्द करण्यात आला होता. तसेच दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडला पराभूत केल्यामुळे इंग्लंडवर साखळी फेरीच्या सामन्यात स्पर्धेबाहेर होण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र अखेरच्या दोन्ही सामन्यात ओमान आणि नामिबिया विरूध्द इंग्लंडने मोठा विजय संपादन केला होता. मात्र, अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंड विरुद्ध विजय संपादन केल्यामुळे इंग्लंडला सुपर ८ मध्ये आपला प्रवेश निश्चित करता आला होता. मात्र, या निर्णायक टप्प्यावर दाखल झाल्यानंतर इंग्लंडने आपला खेळ उंचावला होता.

हे देखील वाचा : IND vs BAN : उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी टीम इंडिया सज्ज

इंग्लंडने पहिल्या सामन्यात वेस्टइंडिज विरूध्द ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवून विजयी सलामी दिली होती.मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडला ७ धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. मात्र, अमेरिकेविरूध्द शानदार विजय संपादन करून इंग्लंडने उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे. विशेष म्हणजे संघाचा कर्णधार जॉस बटलर फॉर्मात परतला असल्याने भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा असणार आहे.तसेच जॉनी बेयरस्टो, फील सॉल्ट, हॅरीब्रूक हे फलंदाज फॉर्मात आहेत. गोलंदाजीत जोफरा आर्चर, आदिल रशिद, क्रिस जोर्डन, मोईन अली, रीस टाॅपली, सॅम करण हे गोलंदाज सातत्याने संघाला बळी मिळवून देत आहेत.

हे देखील वाचा : IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज लढत; कुणाचे पारडे जड?

त्याबरोबरच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा लयीत परतला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सुपर ८ मधील अखेरच्या सामन्यात ९२ धावांची खेळी करून आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय रिषभ पंत, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, सुर्य कुमार यादव हे फलंदाज फॉर्मात आहेत. गोलंदाजीत अर्शदिपसिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव संघाला निर्णायक क्षणी बळी मिळवून देउन सामन्याला कलाटणी देत आहेत. तसेच आजच्या सामन्याच्या दिवशी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय सामना पूर्ण करण्यासाठी २५० मिनिटांचा कालावधी असणार आहे.

हे देखील वाचा : ‘जायंट किलर’ अफगाणिस्तान संघाला भारत रोखणार का?

दरम्यान, भारताला अॅडलेड ओव्हल स्टेडियमवर २०२२ मध्ये झालेल्या उपांत्य फेरीत इंग्लंडने १० गडी राखून पराभूत केले होते. त्यामुळे या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारत सज्ज असणार आहे. तसेच भारतीय संघाने सुपर ८ मध्ये आपले सर्व ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत अव्वलस्थानी असल्याने भारतीय संघाला थेट अंतिम सामन्यात पात्र ठरण्याची संधी असणार आहे. हे मैदान फिरकी गोलंदाजी करता अनुकूल असल्यामुळे येथे फिरकी गोलंदाजांची भूमिका महत्वाची असणार आहे.भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये परदेशी खेळपट्ट्यांवर ३ सामने खेळविण्यात आले आहेत. भारतीय संघाने २ तर इंग्लंड संघाने १ विजय संपादन केला आहे. तसेच टी २० सामन्यात २२ वेळा दोन्ही संघांमध्ये सामना खेळविण्यात आला आहे. त्यात भारताने १२ तर इंग्लंडने १० सामन्यात विजय संपादन केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या