Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाभारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना

मुंबई | Mumbai

भारताने दक्षिण आफ्रिकेला ३ टी २० सामन्यांच्या मालिकेत २-१ ने पराभूत केल्यानंतर आता शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. आज लखनऊच्या एकना मैदानावर दुपारी १.३० वाजता भारत आणि दक्षिण आफ्रिका (India and South Africa) यांच्यात पहिला एकदिवसीय सामना होणार आहे…

- Advertisement -

भारताचा मुख्य संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला (Australia) रवाना झाल्याने भारतीय संघात रजत पटीदार, सौरभ कुमार, शहाबाज अहमद, राहुल त्रिपाठी या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

तर आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली असून त्याने आतापर्यंत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत श्रीलंका आणि वेस्टइंडीजविरुद्ध भारताचे कर्णधारपद भूषवले आहे.

भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड उतरण्याची शक्यता आहे. तर मधल्या फळीतील जबाबदारी ईशान किशन, संजू सॅमसन, रजत पटीदार, राहुल त्रिपाठी, श्रेयस अय्यर यांच्यावर राहील. याशिवाय अष्टपैलूंमध्ये शहाबाज अहमद, शार्दूल ठाकूर असून गोलंदाजांची भिस्त दीपक चाहर, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज, आवेश खान, कुलदीप यादव, रवी बिश्नोई यांच्यावर असणार आहे.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका आतापर्यंत ८७ वेळा आमनेसामने आले असून यात भारताने ३५ तर दक्षिण आफ्रिकेने ४९ सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. तसेच आजच्या सामन्यात शिखर धवन, श्रेयस अय्यर, टेम्बा बाऊमा, क्विंटन डिकॉक हे स्टार प्लेअर्स ठरू शकतील.

सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या