Saturday, November 16, 2024
Homeक्रीडाWomen’s T20 World Cup : आज भारत-श्रीलंका आमनेसामने; कोण जिंकणार?

Women’s T20 World Cup : आज भारत-श्रीलंका आमनेसामने; कोण जिंकणार?

मुंबई | Mumbai

आयसीसी महिला टी २० विश्वचषक (ICC Women’s T20 World Cup) स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाचा सामना आज बुधवार (दि.९ ऑक्टोबर) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७ वाजता श्रीलंकेशी होणार आहे. न्यूझीलंडविरूध्द झालेल्या सलामीच्या लढतीत ५८ धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागलेल्या भारतीय महिला संघाने (Women Team) रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानविरुध्द ६ गडी राखून विजय संपादन करत स्पर्धेमध्ये आपला पहिला विजय संपादन करत उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ajit Pawar : अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार; माजी मंत्री शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर

दुसरीकडे श्रीलंका संघाला (Sri Lanka Team) पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. श्रीलंका संघाला पराभवाची हॅट्रीक टाळण्याची संधी असणार आहे. तर भारतीय संघ आपली विजयी मोहीम सुरू ठेवण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. आशिया चषक (Asia Cup) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाला श्रीलंकेच्या संघाने पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारताचा प्रयत्न असणार आहे.

हे देखील वाचा : Rahul Gandhi : हरियाणातील पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “निकाल…”

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत दुखापतग्रस्त झाली होती. तिची दुखापत कितपत गंभीर आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. हरमनप्रीत कौर श्रीलंकेविरुद्ध खेळू न शकल्यास भारतीय महिला संघाची कमान सलामीवीर फलंदाज स्मिती मंधानाकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. तर श्रीलंका संघाची कमान चमारी आट्टापटटूकडे (Chamari Attapattu) असणार आहे. तसेच दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३१ सामने खेळविण्यात आले असून भारताने २१ आणि श्रीलंकेने ९ सामन्यात बाजी मारली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या