Saturday, July 6, 2024
Homeक्रीडाIND vs USA : भारत-अमेरिका आज भिडणार; पाकिस्तानचा सुपर-८ चा प्रवेश टीम...

IND vs USA : भारत-अमेरिका आज भिडणार; पाकिस्तानचा सुपर-८ चा प्रवेश टीम इंडियाच्या हातात

जाणून घ्या नेमकं समीकरण काय?

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

आयसीसी टी २० (ICC T20) विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये आज बुधवार (दि. १२ जून) रोजी न्यूयॉर्क येथील नसाऊ क्रिकेट काउंटी स्टेडियमवर भारतीय संघाचा सामना अमेरिकेशी (IND vs USA) होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघांमध्ये प्रथमच टी २० सामना खेळविला जात आहे. अमेरिकेने पाकिस्तान आणि कॉनडाविरुद्ध आयसीसी टी २० विश्वचषकाच्या स्पर्धेत कर्णधार आणि यष्टिरक्षक फलंदाज मोनाक पटेलच्या नेतृत्वात शानदार विजय संपादन केला आहे. त्यानंतर आज भारताविरुद्ध विजय मिळवून सुपर ८ मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असणार आहे.

दुसरीकडे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने आयर्लंड आणि पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध विजय संपादन केला आहे. त्यामुळे आता अमेरिकाविरूध्द विजय संपादन करून विजयी हॅट्रीक करण्याचा भारताचा (Team India) प्रयत्न असणार आहे. भारतीय संघासाठी जमेची बाजू म्हणजे यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत, रोहित शर्मा आणि अक्षर पटेल यांनी चांगली फलंदाजी केली आहे. मात्र, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे या खेळाडूंना आपली चमक दाखवता आलेली नाही.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी; ‘हे’ उमेदवार रिंगणात

तसेच अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या फलंदाजीमध्ये अपयशी ठरला असला तरी त्याने गोलंदाजीत आपली भूमिका चोख बजावली आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह, अर्शदिप सिंग आणि अक्षर पटेल यांनी हार्दिकला चांगली साथ दिली आहे. मात्र रवींद्र जडेजा फलंदाजी आणि गोलंदाजीत मागील दोन्ही सामन्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. या सामन्यातील विजयाने सुपर ८ मध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.

तर अमेरिका (America) संघासाठी अॅंडरीस गस, एरन जोन्स, मोनाक पटेलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. मात्र, सलामीवीर फलंदाज स्टीवन टेलरला अद्याप सुरू गवसलेला नाही. गोलंदाजीमध्ये नखतुश केजिंगे, सौरभ नेत्रावलकर या गोलंदाजांनी मागील दोन्ही सामन्यात सर्वाधिक बळी घेतले आहेत. पंरतु, अली खान, हरमीत सिंग, कोरी अँडरसन हे आपल्या गोलंदाजीतून चमक दाखवण्यात अपयशी ठरले आहेत.

हे देखील वाचा : IND vs PAK : आज भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज लढत

दरम्यान, मागील दोन्ही सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. तर पाकिस्तान विरुद्ध झालेल्या अखेरच्या सामन्यात ८९-३ अशा सुस्थितीत असताना भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली होती. तसेच मधल्या फळीतील फलंदाजांना अधिक जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. तर एरन जोन्स, सौरभ नेत्रावलकर, कोरी अँडरसन, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या खेळाडूंवर आजच्या सामन्यात नजर असणार आहे.

पाकिस्तानचा सुपर-८ चा प्रवेश टीम इंडियाच्या हातात

भारताविरुद्ध अमेरिकेचा पराभव झाल्यास पाकिस्तानच्या सुपर ८ मध्ये प्रवेशाच्या आशा कायम राहतील. पाकिस्तानचा आता एकच सामना शिल्लक आहे. पाकिस्तान आणि आयरलँड यांच्यातील सामना १६ जून रोजी होणार आहे. भारताचा अमेरिकेकडून पराभव झाल्यास पाकिस्तानला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला भारताने अमेरिकेला पराभूत करावे, अशी अपेक्षा ठेवावी लागत आहे. तर आस्ट्रेलियाने ब गटातून सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने तीन सामने खेळले असून हे तिनही सामने त्यांनी जिंकले आहेत. तर ब गटातील नामिबिया स्पर्धेबाहेर गेले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने ड गटातून सुपर ८ मध्ये प्रवेश केला असून त्यांनी तीनही सामने जिंकले आहेत. त्यानंतर आजचा सामना भारताने जिंकल्यास भारत देखील सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवू शकतो.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार) विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उपकर्णधार) अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

अमेरिकेचा संघ – मोनांक पटेल (कर्णधार) स्टीव्हन टेलर, अँड्रिज गौस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नोस्तुश केन्झिगे, सौरभ नेत्रावलकर, अली खान

सलिल परांजपे,नाशिक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या