Tuesday, October 22, 2024
Homeक्रीडाDipa Karmakar : 'सुवर्णकन्या' दीपा करमाकरने अचानक घेतली निवृत्ती; पत्र लिहित सांगितलं कारण

Dipa Karmakar : ‘सुवर्णकन्या’ दीपा करमाकरने अचानक घेतली निवृत्ती; पत्र लिहित सांगितलं कारण

मुंबई | Mumbai

भारताची सुवर्णकन्या दीपा करमाकरने अचानक निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट करत दीपा करमाकरने निवृत्तीची माहिती दिली. जिम्नॅस्टिकसारख्या खेळात भारताला पहिले सुवर्णपदक (Gold Medal) पटकावून देण्याचा मान दीपाने पटकावला होता. मात्र, आता दीपाने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : खोसकरांची जाळीवर उडी यशस्वी ठरेल का?

दीपाने करमाकरने (Dipa Karmakar) पोस्टमध्ये म्हटले आहे की, “यापुढे आपल्याला शारीरिकदृष्या हा खेळता येणार नाही.या खेळात चपळपणा लागतो. त्याबरोबरच या खेळात कोणतीही चूक झालेली चालत नाही. एक चूक जीवावर बेतू शकते. त्यामुळे जर आपण फिट नसू तर हा खेळ खेळू नये, असे तिने म्हटले आहे.

हे देखील वाचा : Sharad Pawar : “इंदापुरात जो कार्यक्रम झाला तोच फलटणमध्ये”; भाजपनंतर आता शरद पवार अजितदादांना धक्का देणार

दरम्यान, दीपा करमाकरने २०१८ साली झालेल्या जिम्नॅस्टीकच्या वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. यापूर्वी भारताच्या एकाही खेळाडूला या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावता आले नव्हते. तसेच दीपाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) रौप्यपदकाची कमाई केली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिने एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावले आहे. पंरतु, आता तिने कमी वयात निवृत्तीचा निर्णय घेतल्याने बऱ्याच जणांना हे पटलेले नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या