मुंबई | Mumbai
न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंड आणि भारतामध्ये ११ जानेवारीपासून होणार्या वनडे सीरीजसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआय निवड समितीने मालिकेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून एकदिवसीय संघाची घोषणा केव्हा केली जाणार? याची प्रतिक्षा होती. बीसीसीआयने ही प्रतिक्षा अखेर संपवली असून १५ जणांच्या खेळाडूंची घोषणा केली आहे.
बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड कमिटीने ३ सामन्यांसाठी वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी शुभमन गिलला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा या दोघांना संघातून वगळण्यात आले आहे. तर हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. श्रेयस अय्यरचे संघात पुनरागमन झाले आहे.
नव्या वर्षाची सुरवात युध्दाने? अमेरिकेचा व्हेनेझुएलाच्या मिलिट्री, नेव्ही बेसवर हल्ला
यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिरीज याचं देखील टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली आहे. नीतीश रेड्डी देखील संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान टीम इंडियाचा अनुभवी आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला पुन्हा एकदा निवड समितीने डच्चू दिला आहे. शमीला या मालिकेत संधी मिळेल, असे म्हटले जात होते. मात्र निवड समितीने शमीला पुन्हा एकदा वगळले आहे. त्यामुळे आता शमीला पुन्हा संधी मिळेल, याची आशा धुसर झालीय.
विराट कोहली आणि रोहित शर्मा या अनुभवी खेळाडूंना या वनडे मालिकेसाठी संघात कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, वर्कलोड मॅनेजमेंटचा विचार करून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
असा असेल संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, हर्षित राणा आणि नीतीश कुमार रेड्डी.




