भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) लेफ्ट आर्म मध्यमगती गोलंदाज चेतन सकारिया (Chetan Sakariya) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. मेघना जंबूचाशी त्याने विवाह केला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जयदेव उनाडकट याने लग्नाचा एक फोटो शेअर करुन ही माहिती दिली आहे.
दोन्ही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करतात. चेतन सकारियाला गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये सातत्याने संधी मिळत आहे. तो आयपीएल मध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला आहे.
हे देखील वाचा : “नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज” – आ. खोसकरांचा दावा
तसेच आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा एक भाग होता. राजस्थान रॉयल्स (RR) संघाकडून त्याने आयपीएल (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये पदार्पण केले आहे.तसेच तो भारतीय क्रिकेट संघाकडून खेळला आहे.
चेतन सकारिया ने जूलै २०२१ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर (Shrilanka Tour) भारतीय क्रिकेट संघाकडून पदार्पण केले आहे. मात्र केवळ एक एकदिवसीय आणि २ टी २० सामने खेळवून त्याला वगळण्यात आले आहे. २६ वर्षीय चेतन सकारियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ३ गडी बाद केले आहेत.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार थेट मोदीबागेत; थोरल्या पवारांची भेट की आणखी काही?
तो काही काळापासून दुखापतीमुळे बाहेर आहे. तसेच आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून एकही सामना खेळू शकला नव्हता. दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत त्याला अनेक सामन्यातून बाहेर बसावे लागले आहे.
चेतन सकारियाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना जयदेव उनाडकट ने इंट्राग्राम वरील फोटोसह कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, तुझ्या कारकिर्दीत मी तूला अनेक चमकदार स्पेल टाकताना तसेच सामने जि़ंंंकताना पाहिले आहे. हा तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा स्पेल आहे.
सलिल परांजपे नाशिक.