नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवाची (Navratri festival) धामधूम सुरू असून आज शेवटची माळ आहे. नवरात्रीमध्ये विविध सामाजिक मंडळांकडून दांडियाचे (Dandiya) आयोजन केले जाते. यामध्ये महिलांसह पुरुष मंडळीही सहभागी होऊन गरबा नृत्याचा (Garba dance) आनंद लुटतात.
मात्र देशाच्या रक्षणासाठी सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या भारतीय जवानांना (Soldiers) कोणत्याही सण उत्सवाचा आनंद घेता येत नाही. पंरतु या जवानांना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते पुरेपूर सण उत्सवाचा आनंद घेतात. असाच या जवानांचा गरबा नृत्यावर नाचतानांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
भारतीय जवानांचा गरबा नृत्याच्या तालावर नाचतानाचा हा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा (Entrepreneur Anand Mahindra) यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर रिट्वीट केला आहे. या व्हिडीओत गरबाच्या स्टेप करणारे गणवेशामधील जवान दिसत असून हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही.