मुंबई | Mumbai
आजपासून श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) टी २० सामन्यांची मालिका सुरु होत असून बीसीसीआय़ने (BCCI) श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी (ODI series) भारतीय संघ जाहीर केला आहे. यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या एका खेळाडूची निवड झाली आहे…
भारतीय निवड समितीने श्रीलंकाविरुद्धच्या १० ते १५ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) टीम इंडियात समावेश केला आहे. त्यामुळे आता बुमराह पुन्हा एकदा भारतीय संघातून खेळतांना दिसणार आहे.
बुमराहने गेल्यावर्षी जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यातून कमबॅक केले होते. त्यानंतर तो आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत खेळू शकला नव्हता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन केले होते. त्यात २ टी २० सामन्यांत एकूण सहा षटके टाकली होती आणि दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला होता.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.