नवी दिल्ली | वृत्तसंस्था
नवी दिल्लीत आज झालेल्या खो खो वर्ल्डकप फायनलमध्ये भारताच्या महिला संघाने खो खो वर्ल्डकपमध्ये इतिहास घडवला आहे. भारताने नेपाळवर नेत्रदीपक विजय मिळवत पहिल्यांदा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा ७८ विरुद्द ४० अशा फरकाने पराभव करत पहिल्यांदाच खो खो वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले.
महिला खो खो वर्ल्ड कप स्पर्धेला 13 जानेवारीपासून इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सुरुवात झाली. टीम इंडियाने या स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 176 पॉइंट्सच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवत शानदार सुरुवात केली होती. टीम इंडियाने त्यानंतर अशीच कामगिरी अंतिम सामन्यापर्यंत सुरु ठेवली आणि वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचं या वर्ल्ड कप विजयानंतर साऱ्याच स्तरातून सोशल मीडियावरुन अभिनंदन केलं जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा