Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशकेंद्र सरकारच्या महत्वाच्या निर्णयामुळे अमेरिकेत भारतीयांच्या तांदूळ खरेदीसाठी रांगा

केंद्र सरकारच्या महत्वाच्या निर्णयामुळे अमेरिकेत भारतीयांच्या तांदूळ खरेदीसाठी रांगा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

मोदी (Narendra Modi Government) सरकारने देशातील तांदळाचे (Rice) वाढते भाव रोखण्यासाठी बिगर बासमती (Basmati Rice) तांदळाच्या निर्यातीवर (Rice Export) बंदी घालण्याचा निर्णय घेतला. परंतु, याचे पडसाद अमेरिकेत दिसू लागले आहेत. अमेरिकेत (Americe) राहणाऱ्या भारतीयांनी बासमती तांदूळ खरेदीसाठी सुपर मार्केटमध्ये (Super Market) प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे….

- Advertisement -

याबाबत अन्न मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, गैर-बासमती तांदूळ आणि बासमती तांदळाच्या निर्यात धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण तांदळाच्या २५ टक्के वाटा गैर-बासमती पांढऱ्या तांदळाचा आहे. भारताच्या या निर्णयानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी स्वत:कडे तांदळाचा जास्तीत जास्त साठा करण्यासाठी सुपर मार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहेत.

NCP Crisis : …अन् जयंत पाटलांनी मारली सुनील तटकरेंना मिठी; काय झाली चर्चा?

दरम्यान, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश (Country) असल्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर इतर देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर तांदळाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि किमतीतही वाढ होऊ शकते. देशातील किंमती कमी करण्यासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असले तरी रशियाने काळ्या समुद्रातील धान्य करार रद्द केल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या