Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशभारत फिलीपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्र देणार , 2777 कोटी रुपयांचा करार

भारत फिलीपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्र देणार , 2777 कोटी रुपयांचा करार

भारताला स्वदेशी बनावटीच्या ब्रह्मोस(Brahmos Missile) क्षेपणास्त्रासाठीची मोठी ऑर्डर मिळाली आहे. फिलीपिन्ससोबत भारताचा हा करार झाला असून, ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (BAPL) सोबत $374 मिलीयन डॉलरच्या म्हणजेच 2777 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. फिलीपिन्स आणि चीन दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने हे मोठे पाऊल उचलले आहे.

वादग्रस्त वक्तव्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारीने मागितली माफी, म्हणाली…

- Advertisement -

BAPL ही भारतातील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ची संयुक्त उद्यम कंपनी आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, हा करार भारत सरकारच्या जबाबदार संरक्षण निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांवर फिलीपिन्सने विश्वास टाकला.BAPL इंडो-रशियन संयुक्त उपक्रमांतर्गत सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची निर्मिती करते. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका, विमान किंवा जमिनीवरुन सोडले जाऊ शकते. भारतीय लष्कराने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अनेक मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि इतर महत्त्वाची शस्त्रे तैनात केली आहे.

इतर देशांशी चर्चा

ब्रह्मोसच्या या निर्यातीमुळे भारताच्या शस्त्रास्त्र निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे. आता भारताला इतर मित्र देशांकडूनही ऑर्डर अपेक्षित आहेत. इतर काही देशांशीही यासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या