Sunday, May 5, 2024
Homeक्रीडाWTC फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा : या मोठ्या खेळाडूने पुनरागमन

WTC फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा : या मोठ्या खेळाडूने पुनरागमन

मुंबई :

जून महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. तसेच इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटींसाठी संघ जाहीर केला आहे. २० सदस्यांच्या या संघात ऑलराउंडर रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाले आहे.

- Advertisement -

लसीकरणासाठी जाताय, तर CoWIN पोर्टलवरील हा बदल समजून घ्या…

बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने खेळाडूंची निवड केली आहे. अंतिम सामन्यासाठी नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हा अंतिम सामना १९ ते २३ जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

ही आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,

- Advertisment -

ताज्या बातम्या