Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजइंडिगोच्या गोंधळाचा असाही फटका; नागपूर अधिवेशनाआधी मंत्री, आमदारांची उडाली धावपळ, अनेकांची तिकिटं...

इंडिगोच्या गोंधळाचा असाही फटका; नागपूर अधिवेशनाआधी मंत्री, आमदारांची उडाली धावपळ, अनेकांची तिकिटं रद्द

नागपूर | Nagpur
नागपूरमध्ये होणाऱ्या या अधिवेशनाला इंडिगोच्या गोंधळाचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी मुंबई आणि इतर ठिकाणांहून विमानाने निघणार होती. त्यांनी इंडिगोची तिकिटेही घेतली होती. पण सलग सहाव्या दिवशीही इंडिगोचा गोंधळ थांबलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच मंत्र्यांनाही मोठा फटका बसला आहे.

सोमवारपासून (ता. ८ डिसेंबर) राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यामुळे राज्यातील मंत्री, आमदार, अधिकारी हे आजच नागपुरात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, अनेक नेतेमंडळींनी नागपुरात पोहोचण्यासाठी इंडिगोचे तिकीट काढले होते. पण आता या कंपनीची विमानसेवाच ठप्प झाल्यामुळे हे मंत्री, आमदार मोठ्या संकटात सापडले आहेत. मुंबई – नागपूर आणि पुणे – नागपूर या महत्त्वाच्या मार्गावरील उडाणे रद्द होत असल्याने मंत्री, आमदार आणि त्यांचे पीए, तसेच, राज्यातील असे अधिकारी जे या अधिवेशनाला जाणार आहेत, त्यांच्यावर सुद्धा या विस्कळीत विमानसेवेचा परिणाम झाला आहे. इंडिगोचे विमान रद्द झाल्याने अनेक आमदारांनी आता रेल्वे आणि रस्ते प्रवासाचा मार्ग अवलंबला आहे

- Advertisement -

समृध्दीचा मार्ग स्विकारला
अनेक आमदार व मंत्री समृद्धी महामार्गाच्या पर्याय स्वीकारून नागपुरात पोहोचतील आणि अधिवेशनात सहभागी होतील. काही आमदारांनी समृद्धी मार्गे नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी रेल्वेद्वारे जाण्याचे नियोजन केल्याचे समजते. तर काही मंत्री चार्टर विमानाने येणार असल्याचे समजते. दरम्यान इंडिगोमुळे मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडल्याचे दिसून आले.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सुद्धा इंडिगोचे विमानाचे तिकिट बूक केले होते. पण इंडिगोचे उड्डाण रद्द झाल्याकारणाने त्यांनी रेल्वेच्या विदर्भ एक्स्प्रेसने प्रवास करत नागपूर गाठले. त्याशिवाय, मंत्री संजय राठोड हे सुद्धा रेल्वेने प्रवास करत नागपुरात पोहोचले आहेत. तर, अनेक आमदार व मंत्री समृद्धी महामार्गाच्या पर्याय स्वीकारून नागपुरात पोहोचतील आणि अधिवेशनात सहभागी होतील. दरम्यान इंडिगोमुळे मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडल्याचे दिसून आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...