Wednesday, September 30, 2026
HomeनगरAhilyanagar : नेवासा, श्रीरामपूरच्या वजनदार नेत्यांसोबत सभापती शिंदे करणार चर्चा

Ahilyanagar : नेवासा, श्रीरामपूरच्या वजनदार नेत्यांसोबत सभापती शिंदे करणार चर्चा

नगरमध्ये उद्या गडाख, मुरकुटे आणि अभंग यांच्या सोबत गाठीभेटी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना सुरूवात होताना दिसत आहे. भाजप नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटींचा धडाका सुरू केला असून, उत्तर नगर जिल्ह्यातील बड्या नेत्यांनंतर आता त्यांनी आपला मोर्चा नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यातील वजनदार नेत्यांकडे वळवला आहे.

- Advertisement -

गुरूवारी नगरमध्ये यशवंतराव गडाख यांच्या निवासस्थानी गडाख कुटूंबासोबत, त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर माजी आ. भानुदास मुरकुटे व शिष्टमंडळ, तसेच पांडूरंग अंभग व त्यांचे समर्थक यांच्या सोबत सभापती शिंदे चर्चा करणार आहेत. यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर काय खल होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू असून मतदानासाठी पात्र असणार्‍या संस्थांच्या प्रतिनिधीचे ठराव निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल झालेले आहेत. दाखल या ठरावांची तपासणी करून लवकरच प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीसाठी भापज नेते राम शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून मोर्चबांधणीला सुरूवात केली आहे. यासाठी त्यांनी विखे विरोधक असणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात समर्थक, कोपरगावचे आ. विवेक कोल्हे, राहुरीचे आ. प्राजक्त तनपुरे आणि ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांची आधीच भेट घेतलेली आहे.

आता उद्या ते नगरमध्ये यशवंत कॉलनीत नेवासा तालुक्याचे ज्येष्ठ गडाख परिवार यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर जिल्हा बँकेचे माजी संचालक व श्रीरामपूरचे ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे व त्यांचे शिष्टमंडळ यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर नेवासा-शेवगावा तालुक्यातील ज्येष्ठ नेते माजी आ. पांडरंग अंभग यांची भेट घेणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने गडाख, मुरकुटे आणि अंभग हे बडे नेते असून त्यांच्या सोबत सभापती शिंदे यांची बैठक होणार असल्याने राजकीयदृष्ट्या त्याला महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी जिल्हा बँकेच्या दृष्टीने होणार्‍या चर्चेला महत्व असल्याने जिल्ह्याचे लक्ष या बैठकीकडे राहणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी शिंदे गटही उतरविणार उमेदवार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना व्यक्त करत, निवडणुकीत...