Friday, November 22, 2024
Homeनगरदुधातील भेसळ बंद करा, दुधाचे भाव शंभरावर गेल्याशिवाय राहणार नाही - इंदोरीकर...

दुधातील भेसळ बंद करा, दुधाचे भाव शंभरावर गेल्याशिवाय राहणार नाही – इंदोरीकर महाराज

भोकर |वार्ताहर| Bhokar

आज देश सांभाळण्याचे काम केवळ शेतकरी व गरीब करत आहेत, मोठ्यांनी फक्त देश लुटला आहे. सध्या सुरू असलेली दुधातील भेसळ बंद करा, दुधाचे दर शंभर रुपयांवर गेल्याशिवाय राहणार नाही. शरीर चांगले आहे. तोपर्यंत परमार्थ करून घ्या. आणखी दहा वर्ष गुरूवर्य नारायणगिरी महाराज असते तर बरेच कीर्तनकार निट झाले असते. नारायणगिरी महाराज हे चालतं बोलतं ब्रम्ह होते. तर आज अंर्तबाह्य संत म्हणजे केवळ श्रीक्षेत्र देवगडचे गुरूवर्य भास्करगिरी महाराज हे आहेत, असे प्रतिपादन निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.

- Advertisement -

श्रीक्षेत्र भोकर येथील श्रीक्षेत्र रेणुकामाता देवस्थान प्रांगणात शारदीय नवरात्रौत्सवानिमीत्त आयोजीत कीर्तन महोत्सवप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवृत्ती महाराज विधाटे, प्रसाद महाराज गायकवाड, किरण महाराज हराळे, ऋषीकेश महाराज शेटे, सुदाम महाराज चौधरी, आमदार लहु कानडे, अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे, काँग्रेससेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदामराव पटारे, भाजपाचे सतीष शेळके, राहुल अभंग, सरपंच शितल पटारे, माजी सरपंच पुनम पटारे, प्रताप पटारे, उपसरपंच सागर आहेर, जालिंदर पटारे, सोहळ्याचे कार्यवाहक गणेश छल्लारे, ठकसेन खंडागळे, गंगाराम गायकवाड आदी प्रमुख मान्यवर उपस्थीत होते.

इंदोरीकर महाराज पुढे म्हणाले, आपल्या देशात केवळ शेतकरी आणि गरीब या दोघांनीच देश सांभाळलाय बाकीच्या मोठ्यांनी केवळ देश लुटलायं. कारण पोलीस भरतीत, सैनिक भरतीत केवळ शेतकरी आणि गरीबांचेच मुले आहेत. याच गरीब कुटूंबातील आई आपल्या मुलाला सांगते बाबा 15 वर्ष देशाचे रक्षण करत देशसेवा कर आणि नंतर घरी येवून काळ्या आईची सेवा कर. कुठल्याही राजकीय नेत्यांचा, किंवा उद्योगपतीचा मुलगा या पोलीस भरतीत व सैनिक भरतीत दिसत नाही, जात नाही म्हणून देश सांभाळण्याचे काम फक्त शेतकरी व गरीबच करतो.

या जगात सध्या विद्वान व निष्ठावान तसेच खरं बोलणार्‍यांची किंमत शून्य आहे. माझी ही तीच अवस्था आहे, मी खरं बोलतो हाच माझा खरा गुन्हा आहे. म्हणून कायम माझ्या मागे काहीना काही सुरूच असते. सध्या तीन महिन्यांपासून 288 जागांसाठी सरकारी खर्चातून कार्यक्रम सुरू आहे. येथे समाज लाचार झाला की, बुद्धीहीन माणसे मोठी होतात. हे अद्यापपर्यंत समाजाला समजले नाही. हे दुर्भाग्य आहे, असे इंदोरीकर महाराज म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या