Wednesday, January 7, 2026
Homeक्रीडाINDvsAUS Second ODI: भारताचे ऑस्ट्रेलियाला २६५ धावांचे आव्हान; रोहित-श्रेयसच्या जोडीने संघाला तारले,...

INDvsAUS Second ODI: भारताचे ऑस्ट्रेलियाला २६५ धावांचे आव्हान; रोहित-श्रेयसच्या जोडीने संघाला तारले, कोहलीची पुन्हा निराशा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने २६५ धावांचे आव्हान दिले आहे. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल ९ धावांवर बाद झाला, तर त्याच षटाकांत विराट कोहली शून्यावर बाद झाला.

या सामन्यात रोहित शर्मा ७३, श्रेयस अय्यर ६१ आणि अक्षर पटेल ४४ रन्सची खेळी करत महत्त्वपूर्ण योगदान दिले. हर्षित राणानेही १८ चेंडूंमध्ये नाबाद २४ रन्स केले तर अर्शदीप सिंगने ही १३ धावा शेवटी करत धावसंख्या मजबूत केली. तर ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झॅम्पाने सर्वाधिक ४ बळी घेतले तर जेवियर बार्टलेट आणि मिशेल स्टार्कने २ बळी घेतले.

- Advertisement -

भारतीय संघाची निराशाजनक सुरवात
नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. पण टीम इंडियाच्या फलंदाजीची सुरुवात काहीशी निराशाजनक होती. संघाच्या १७ धावा असतानाच भारताला पहिला धक्का बसला. कर्णधार शुभमन गिल ९ रन्स करून जेवियर बार्टलेटच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच ओव्हरमध्ये बार्टलेटने विराट कोहलीलाही शून्यावर बाद केले. कोहली सलग दुसऱ्या सामन्यात भोपळा न फोडता बाद झाला.

YouTube video player

यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ रन्सची पार्टनरशिप केली. या दोन्ही फलंदाजांच्या पार्टनरशिपमुळे भारताचा डाव सावरला. रोहितने ७४ चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे २०१५ नंतरचे सर्वात संथ अर्धशतक ठरले.

मिशेल स्टार्कने रोहितला बाद केले
रोहित आणि श्रेयस अय्यरची जोडी चांगली सेट झालेली असतानाच मिशेल स्टार्कने हेजलवूडकरवी रोहितला झेल देण्यास भाग पाडले. रोहितने ९७ चेंडूत ७३ धावा केल्या ज्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. यानंतर काही वेळातच श्रेयस अय्यरही बाद झाला. त्याने ७७ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या.

यानंतर केएल राहुल (११), वॉशिंगटन सुंदर (१२) आणि नीतीश कुमार रेड्डी (८) या तिन्ही खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. मात्र अक्षर पटेलने ४४ रन्स करत भारताला २०० रन्सच्या पार नेण्यात मदत केली. शेवटच्या ओव्हर्समध्ये हर्षित राणा (२४*) आणि अर्शदीप सिंह (१३) यांनी चांगली फलंदाजी करत भारताला मजबूत स्कोअर मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून एडम झॅम्पाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...